शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

धर्मराव आत्रामांच्या बंधूचा भाजपात प्रवेश

By admin | Updated: October 12, 2014 23:34 IST

अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व विद्यमान जिल्हाध्यक्ष माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे बंधु जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम यांच्यासह अनेक

अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व विद्यमान जिल्हाध्यक्ष माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे बंधु जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम यांच्यासह अनेक दिग्गज नेते व कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात आलापल्ली येथील जाहीर सभेत प्रवेश केला.आलापल्ली येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची जाहीर सभा रविवारी पार पडली. या सभेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम, युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल आईलवार, पुलय्या इसनकर, सांबय्या तुमडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रवींद्रबाबा आत्राम यांनी पक्ष शिस्तीचा भंग केला म्हणून त्यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षातून निलंबित केले होते. आता रवींद्र आत्राम यांनी भाजपात प्रवेश केल्याने राज घराण्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाकडून राजे अम्ब्रीशराव मैदानात असल्याने रवींद्रबाबा आत्रामांच्या प्रवेशाला वेगळे महत्व आहे. या जाहीर सभेला अम्ब्रीशराव महाराज, खासदार अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, भाजपचे प्रदेश सरचिटणीस बाबुराव कोहळे, अवधेशराव आत्राम, मधुकर नामेवार, भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अब्बास बेग, रहीमा सिद्धीकी, विनोद अकनपल्लीवार, माजी पं. स. सभापती मंदा गावडे, जि. प. सदस्य नंदा दुर्गे, पं. स. सदस्य सुनिता मंथनवार आदी उपस्थित होते. संचालन सतीश गोटमवार यांनी तर आभार मुकेश नामेवार यांनी मानले. सभेला खा. अशोक नेते, अरविंद पोरेड्डीवार यांनीही मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)