धानोरात ललित बरछा गट साऱ्याच पक्षांवर ‘भारी’

By Admin | Updated: November 8, 2015 01:36 IST2015-11-08T01:36:29+5:302015-11-08T01:36:29+5:30

१७ सदस्यीय धानोरा नगर पंचायतीत काँग्रेसमधून निष्काशीत करण्यात आलेले नेते ललीत बरछा यांच्या ग्राम विकास आघाडीने दणदणीत यश मिळविले.

Dhanrotta Fine Barcha Group 'heavy' on all parties | धानोरात ललित बरछा गट साऱ्याच पक्षांवर ‘भारी’

धानोरात ललित बरछा गट साऱ्याच पक्षांवर ‘भारी’

कॉग्रेसला मिळाली केवळ एकच जागा : भाजपने पाच जागांवर केला कब्जा
धानोरा : १७ सदस्यीय धानोरा नगर पंचायतीत काँग्रेसमधून निष्काशीत करण्यात आलेले नेते ललीत बरछा यांच्या ग्राम विकास आघाडीने दणदणीत यश मिळविले. या आघाडीने ९ जागा पदरात पाडत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. येथे भाजपला ५ , काँग्रेसला १ तर अपक्षाला १ जागा मिळाली आहे.
धानोराच्या प्रभाग क्रमांक १ मधून धाईत सुभाष गिरीधर ८३ मते घेऊन विजयी झाले आहेत. तर या प्रभागात कनिजा ईसाक शेख यांना १२, सुनिल गडपायले २९, घनश्याम राऊत २०, सुभाष धाईत ८३, इरफान पठाण ४०, प्रदीप सूर्यवंशी ९, अजुर्न सोमनकर यांना ६ मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक २ मधून मंगला जनार्धन मडावी या सर्वाधिक ६५ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. याच प्रभागातील सुनंदा कळ्यामी ४६, अनिता तुमराम १३, निराशा मडावी यांना ४९ मते मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक ३ मधून विनोद रामभाऊ निंबोरकर हे सर्वाधिक १०४ मते घेऊन विजयी झाले आहेत. या प्रभागात देवेंद्र दहीकर १, ममता भैसारे ७, भाष्कर मारभते ४०, वकील अहमद जमील अहमद पठाण ५३, शेख अकबर पीरमोहम्मद यांना १० मते मिळाली आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये नरेश राजाराम बोडगेवार हे सर्वाधिक ५२ मते घेऊन विजयी झाले आहेत. देवानंद कांबळे यांना ४८, महादेव गणोरकर १४, रमेश नाकतोडे ३५, नरेश बोडगेवार ५२, कालिदास मोहुर्ले २९ मते मिळाली आहेत. या प्रभागात ४ मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्रमांक ५ मधून गीता प्रेमलाल वालको या ९८ घेऊन विजयी झाल्या. कलिंदा कुळमेथे ७८, चंद्रकला पदा ४४, पौर्णिमा मडावी यांना २२ मते मिळाली आहे. ५ मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्रमांक ६ मध्ये लिना साईनाथ साळवे या १५५ मते घेऊन विजयी झाल्या. जयाताई वरवाडे यांना ४९ मते मिळाली. ५ मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्रमांक ७ मधून अर्चना रवींद्र लेनगुरे विजयी झाल्या आहेत. त्यांना ११२ मते मिळाली. उज्वला मोहुर्ले यांना २८, संध्या लेनगुरे यांना २६ मते मिळाली आहेत. १ मतदाराने नोटाचा वापर केला. प्रभाग क्रमांक ८ मध्ये ललीत धरमसी बरछा हे विजयी झाले आहेत. त्यांना ९९ मते मिळाली आहेत. गजानन गुरनुले यांना ४२, गोविंदा चौधरी ६ व भाष्कर सोनुले यांना २९ मते मिळाली आहेत. ४ मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्रमांक ९ मध्ये रेखा गुणवंत हलामी विजयी झाल्या आहेत. त्यांना ५० मते मिळाली आहेत. भाविका मडावी यांना २४, रत्नाबाई जाळे यांना ४२ मते मिळाली आहेत.१ मतदाराने नोटाचा वापर केला.
प्रभाग क्रमांक १० मध्ये नलीना बाजीराव गुरनुले या विजयी झाल्या आहेत. त्यांना ८७ मते मिळाली आहेत. याच प्रभागात उभे असलेल्या वनमाला गावतुरे ४७, शेवंता थुल १, वनिता निकेसर ४२, सुवर्णा भुरसे यांना २४ मते मिळाली आहेत. १ मतदाराने नोटाचा वापर केला. प्रभाग क्रमांक ११ मधून रंजना प्रकाश सोनुले या ८४ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. भाग्यश्री भाऊराव गुरनुले यांना ६६, मनीषा ओमदेव सोनुले यांना ५१ मते मिळाली आहेत. ५ मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्रमांक १२ मध्ये गणपत विश्वनाथ गुरनुले विजयी झाले आहेत. त्यांना सर्वाधिक ११२ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार देवानंद भेंडारे यांना १०, संदीप बोडगेवार ४, गजानन भोयर ८३, प्रमोद सहारे यांना ४ मते मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक १३ मध्ये विनोद नामदेव मडावी विजयी झाले आहेत. त्यांना ५६ मते मिळाली आहेत. याच प्रभागातून निवडणुक लढविणाऱ्या अवदेश नरोटे यांना ४२, गजानन परचाके यांना ३४ मते मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक १४ मधून कृष्णदास उंदीरवाडे विजयी झाले आहेत. त्यांना ४४ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अमोल भाष्कर चन्नेवार यांना १६, भुषेंद्र भैसारे यांना २९, अनिल म्हशाखेत्री २१, कपिलदेव म्हशाखेत्री ३३ मते मिळाली आहेत. २ मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्रमांक १५ मध्ये वंदना रिनोहर उंदीरवाडे या विजयी झाल्या आहेत. त्यांना सर्वाधिक ५१ मते मिळाली आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार धाराताई जांभुळकर २६, निरंजना मशाखेत्री १४, प्रिती मशाखेत्री ४, वैशाली कुमोद मशाखेत्री २३, वैशाली विनोद मशाखेत्री यांना १४ मते मिळाली आहेत. या प्रभागात ७ मतदारांनी नोटाचा वापर केला.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये वर्षा चिमुरकर या विजयी झाल्या आहेत. त्यांना ६७ मते मिळाली आहेत. अर्चना नरेश बोडगेवार ३, ताराबाई कोटांगले ३६, जयाबाई वरवाडे यांना २ मते मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक १७ मधून सदाशिव येरमे हे विजयी झाले आहेत. त्यांना सर्वाधिक १०१ मते मिळाली आहेत. मिलींद किरंगे यांना ९६, विजय कुमरे १०, निलीमा मडावी यांना ६२ मते मिळाली आहेत. ३ मतदारांनी नोटाचा वापर केला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dhanrotta Fine Barcha Group 'heavy' on all parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.