धानोरात शिक्षकांचे धरणे

By Admin | Updated: September 1, 2016 01:43 IST2016-09-01T01:43:29+5:302016-09-01T01:43:29+5:30

जुनी पेंशन योजना बंद करून नवीन परिभाषित अंशदाय निवृत्ती वेतन योजना (डीसीपीएस)/एनपीएस अंमलात आणली.

Dhanora teachers take care of | धानोरात शिक्षकांचे धरणे

धानोरात शिक्षकांचे धरणे

निवेदन सादर : १० टक्के वेतन कपातीचा हिशेब द्या!
धानोरा : जुनी पेंशन योजना बंद करून नवीन परिभाषित अंशदाय निवृत्ती वेतन योजना (डीसीपीएस)/एनपीएस अंमलात आणली. या योजनेंतर्गत डीसीपीएस/एनपीएसधारक कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून १० टक्के रक्कम कपात करण्यात येते. जि. प. चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून आत्तापर्यंत जमा झालेल्या रकमेचा पावती स्वरूपात हिशेब देण्यात आला. परंतु आजपर्यंत कपात रक्कम व प्राप्त हिशेब यात खूप तफावत आहे. या संदर्भातील हिशेबाच्या मागणीसाठी मंगळवारी जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने धानोरा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
३१ आॅक्टोबर २००५ च्या शासन निर्णयानुसार १ नोव्हेंंबर २००५ पासून शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांची १९८२ ची मूळ पेंशन योजना बंद करून नवीन परिभाषित अंशदाय निवृत्तीवेतन योजना अंमलात आणली. परंतु या योजनेंतर्गत वेतनाच्या १० टक्के कपात करण्यात येत आहे. सदर रकमेचा हिशेब देण्यात आला. परंतु कपात रक्कम व प्राप्त हिशेब यात तफावत आहे. या संदर्भात जि. प. चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच पं. स. चे गटविकास अधिकारी यांना वारंवार पत्रव्यवहार करून निवेदन देऊन हिशेबाची मागणी करण्यात आली. परंतु दुर्लक्ष झाल्याने सदर मागणीसाठी ३० आॅगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला जि. प. सदस्य मनोहर पोरेटी, अ‍ॅड. गजानन दुगा, सुकमा जांगधुर्वे, शिक्षक समितीचे धनपाल मिसार, ग्रामसेवक संघटनेचे खुशाल नेवारे, रमेश बोरकुटे यांनी भेट देऊन चर्चा केली. यावेळी तालुक्यातील शिक्षक हजर होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dhanora teachers take care of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.