शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

धानोरा, चामोर्शीत भाजपला नवे शिलेदार

By admin | Updated: January 15, 2016 02:09 IST

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका सध्या जिल्ह्यात सुरू आहेत. या अंतर्गत तालुका पातळीवर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

चामोर्शीत दिलीप चलाख : धानोरा तालुकाध्यक्षपदी शशिकांत साळवे यांची निवडधानोरा/ चामोर्शी : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका सध्या जिल्ह्यात सुरू आहेत. या अंतर्गत तालुका पातळीवर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गुरूवारी धानोरा तालुका अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक शशिकांत साळवे यांची अविरोध निवड करण्यात आली. तर चामोर्शी तालुका भाजप अध्यक्षपदी दिलीप चलाख यांची निवड करण्यात आली. धानोरा येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रमोद पिपरे यांनी काम पाहिले. त्यांनीच शशिकांत साळवे अविरोध निवडून आल्याची घोषणा केली. चामोर्शी येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमेश भुरसे यांनी काम पाहिले. येथे दिलीप चलाख यांची अविरोध निवड झाली आहे. धानोरा येथील नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे यांचे खा. अशोक नेते, आ. डॉ.देवराव होळी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बाबुराव कोहळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मानद सचिव अनंत साळवे, रामेश्वर सेलुकर, कैलास गुंडावार, अनिल पोहणकर, लता पुंगाटी, स्वप्नील वरघंटे, अविनाश महाजन, गोपाल उईके, भारत खटी, प्रकाश गेडाम, गजानन साळवे, दिलीप गावंडे, विजय कुमरे, देशपांडे व रांगी, धानोरा येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शशिकांत साळवे यांनी धानोरा तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे यावेळी सांगितले.