धानोरा, चामोर्शीत भाजपला नवे शिलेदार
By Admin | Updated: January 15, 2016 02:09 IST2016-01-15T02:09:54+5:302016-01-15T02:09:54+5:30
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका सध्या जिल्ह्यात सुरू आहेत. या अंतर्गत तालुका पातळीवर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

धानोरा, चामोर्शीत भाजपला नवे शिलेदार
चामोर्शीत दिलीप चलाख : धानोरा तालुकाध्यक्षपदी शशिकांत साळवे यांची निवड
धानोरा/ चामोर्शी : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका सध्या जिल्ह्यात सुरू आहेत. या अंतर्गत तालुका पातळीवर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गुरूवारी धानोरा तालुका अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक शशिकांत साळवे यांची अविरोध निवड करण्यात आली. तर चामोर्शी तालुका भाजप अध्यक्षपदी दिलीप चलाख यांची निवड करण्यात आली. धानोरा येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रमोद पिपरे यांनी काम पाहिले. त्यांनीच शशिकांत साळवे अविरोध निवडून आल्याची घोषणा केली.
चामोर्शी येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमेश भुरसे यांनी काम पाहिले. येथे दिलीप चलाख यांची अविरोध निवड झाली आहे. धानोरा येथील नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे यांचे खा. अशोक नेते, आ. डॉ.देवराव होळी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बाबुराव कोहळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मानद सचिव अनंत साळवे, रामेश्वर सेलुकर, कैलास गुंडावार, अनिल पोहणकर, लता पुंगाटी, स्वप्नील वरघंटे, अविनाश महाजन, गोपाल उईके, भारत खटी, प्रकाश गेडाम, गजानन साळवे, दिलीप गावंडे, विजय कुमरे, देशपांडे व रांगी, धानोरा येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शशिकांत साळवे यांनी धानोरा तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे यावेळी सांगितले.