पिढ्यांवर धम्म संस्कार रूजवा
By Admin | Updated: November 15, 2015 00:55 IST2015-11-15T00:55:03+5:302015-11-15T00:55:03+5:30
तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म जीवन जगण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. भगवान गौतम बुद्धांची शिकवण समाजापर्यंत पोहोचवून ...

पिढ्यांवर धम्म संस्कार रूजवा
कोठरी येथे वर्षावासाचा समारोप : भंते भगीरथ यांचे उपासक-उपासिकांना आवाहन
घोट : तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म जीवन जगण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. भगवान गौतम बुद्धांची शिकवण समाजापर्यंत पोहोचवून शांतताप्रिय समाज निर्माण करण्याकरिता धम्म संस्कार पुढच्या पिढीवर रूजविण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पेलावी, असे आवाहन भंते भगीरथ यांनी केले.
चामोर्शी तालुक्यातील कोठरी येथील अरण्यवास बुद्ध विहारात आयोजित वर्षावास समापण सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी भंते प्रज्ञानंद, भंते धम्मरक्षित, भंते गुणानंद, भंते बोधीरथ, विदर्भ भिक्कू संघाचे सचिव डॉ. भदंत धम्मसेवक महाथेरो, माताजी सुजाता, माताजी शीलरक्षिता, श्रामणेर प्रवर्तक, श्रामणेर अमोलरत्न, श्रामणेर धम्मदीप, श्रामणेर धम्मरक्षीत, श्रामणेर अनोमदर्शी, श्रामणेर मोगलायन, श्रमण बोधीप्रिय आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना भगीरथ म्हणाले, बौद्ध धम्म हा वैज्ञानिक धम्म आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक धर्माचा अभ्यास केल्यानंतर धम्मदीक्षा घेतली. जगाला आज धम्माच्या शिकवणीची आवश्यकता आहे. बौद्ध धम्माची शिकवण पुढील पिढीकडे संक्रमीत करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. त्यामुळे धम्माचा प्रसार व प्रचार करण्याकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अरण्यवास सोहळ्याच्या कार्यक्रमाला नागपूर, दिल्ली, मुंबई, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून आलेले बहुसंख्य बौद्ध समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)