पोलीस महासंचालकांच्या दौ-याने जवानांचे मनोधैर्य वाढवले
By Admin | Updated: August 8, 2016 15:23 IST2016-08-08T15:06:05+5:302016-08-08T15:23:38+5:30
राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची सूत्र हाती घेताच सतीश माथूर यांनी गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्याचा दौरा करून या भागात नक्षलवाद्यांविरोधात लढणा-या जवानांचे मनोधैर्य वाढवले.
_ns.jpg)
पोलीस महासंचालकांच्या दौ-याने जवानांचे मनोधैर्य वाढवले
>ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. ८ - राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची सूत्र हाती घेताच सतीश माथूर यांनी गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्याचा दौरा करून या भागात नक्षलवाद्यांविरोधात लढणा-या जवानांचे मनोधैर्य वाढविले. रविवारी पोलीस महासंचालक माथूर गडचिरोली येथे आले. त्यानंतर त्यांनी पोलीस मुख्यालयाला भेट दिली. पोलीस मुख्यालयात शहीद स्मारकाला आदरांजली वाहून शहीद झालेल्या पोलीस जवान व अधिकाºयांचे छायाचित्र असलेल्या दालनाला भेट देऊन त्याची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर शहीद कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या तत्काळ सोडविल्या जातील, असे आश्वासन माथूर यांनी या कुटुंबीयांना दिले. त्यानंतर धानोरा या छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या तालुक्यातील संवेदनशील चातगाव पोलीस मदत केेंद्राला त्यांनी भेट दिली. येथे पोलीस जवानांशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांना मार्गदर्शनही केले. यावेळी विशेष अभियान पथकात कार्यरत कमांडोंशीही माथूर यांनी चर्चा केली. यावेळी त्यांच्या समावेत पोलीस दलातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)