शहरं
Join us  
Trending Stories
1
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
2
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
3
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
4
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
5
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
6
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
7
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
8
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
9
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
10
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
11
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
12
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
14
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
15
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
16
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
17
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
18
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
19
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले

दहा तालुक्यांतील १ लाख ९० हजार बालकांना देण्यात येणार जंतनाशक गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 15:27 IST

आज आरोग्य विभाग राबविणार मोहीम : जंतापासून मुक्त, होतील मुले सशक्त!

दिलीप दहेलकर लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी व चामोर्शी तालुकेवगळता इतर १० तालुक्यात १ ते १९ वर्ष वयोगटातील एकूण १ लाख ९० हजार ९९४ लाभार्थ्यांना बुधवारी (दि. ४) जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आरोग्य विभागाने याबाबत नियोजन केले असून, शिक्षण विभाग व बालकल्याण विभाग यांच्या समन्वयाने १,९०,९९४ मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जंतामुळे बालके व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये विविध आजारांचा धोका उ‌द्भवतो. 

जंतामुळे होतात हे आजार जंतामुळे मुलांमध्ये अॅनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे यासह कुपोषण, वाढ खुंटणे आदी आजारांचा मुलांना धोका असतो. त्यामुळे १ ते १९ वयोगटातील मुलांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी देणे आवश्यक आहे.

३२४४ संस्था सज्ज जिल्ह्यातील १७१३ अंगणवाडी केंद्रे, ११९० जिल्हा परिषद शाळा, ८४ आश्रमशाळा, ९२ खाजगी शाळा, १४ महाविद्यालय, १५१ सरकारी महाविद्यालय अशा एकूण ३२४४ संस्थांमधून मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. या मोहिमेची जय्यत तयारी केली आहे.

बालकांच्या आरोग्याविषयी शंका आहे, मग साधा संपर्क

  • सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जंतनाशकदिनी १ १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २०० मि.ग्रॅ. अल्बेंडाझोलची गोळी पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते. २ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी पावडर करून व पाण्यात विरघळून देण्यात येते. ६ ते १९ वर्षे वयोगटाच्या बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास किंवा पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते.
  • बालकांच्या आरोग्याविषयी काही शंका असल्यास आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १०४वर नागरिक संपर्क करू शकतात किंवा गरज भासल्यास तातडीच्या वैद्यकीय सेवेअंतर्गत कार्यरत रुग्णवाहिका सेवेच्या टोल फ्री क्रमांक १०८ वर संपर्क करून रुग्णवाहिका मागवू शकतात, अशी माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली

शासकीय रुग्णालयात मिळते मोफत गोळी अल्वेंडाझोल ही गोळी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये मोफत दिली जाते. आरोग्य उपकेंद, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यासोबतच अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांतही या गोळ्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जंतसंसर्गाच्या प्रतिबंधासाठी दिली जाणारी ही जंतनाशक गोळी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मोठ्या प्रमाणावर जंतनाशक कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित करण्यात आलेली आहे.

"काही कारणास्तव ४ डिसेंबरला ज्या बालकांना जंतनाशक गोळी दिली गेली नसेल अशा वंचित सर्व बालकांना १० डिसेंबरला मॉप-अपदिनी ही गोळी देण्यात येणार आहे. पालकांनी याबाबत जागरूक राहावे." - डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली

"आरोग्य विभागाकडून डिसेबर आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जंतनाशक मोहीम राबविली जाते. या मोहिमेदरम्यान १ ते १९ वयोगटातील मुलांना अर्धी ते एक गोळी खायला किवा पाण्यात विरघळून दिली जाते." - डॉ. प्रफुल्ल हुलके, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, गडचिरोली

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीHealthआरोग्य