आधुनिक पद्धतीने शेती करून विकास साधावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:26 IST2021-07-10T04:26:00+5:302021-07-10T04:26:00+5:30
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि मानव विकास अंतर्गत ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित महिला बचत गटांना ताटीगुडम ...

आधुनिक पद्धतीने शेती करून विकास साधावा
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि मानव विकास अंतर्गत ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित महिला बचत गटांना ताटीगुडम येथे कापणी यंत्रांचे वाटप करण्यात आले. जय पेरसापेन स्वयंसहायता महिला शेतकरी बचत गट ताटीगुडम, काली महिला शेतकरी बचत गट आसा, पूजा महिला बचत गट झिम्मेला, जागृती महिला बचत गट गुड्डीगुडम, भवानी महिला बचत गट इतलचेरू, लक्ष्मी बचत गट ताटीगुडम, पार्वती महिला बचत गट रेपनपल्ली आदी २२ अनुसूचित जमातीतील महिला शेतकरी बचत गटांना कापणी यंत्राचे वाटप भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मीरा मडावी, रेखा दुर्गे, शारदा आत्राम, सुनीता कुळमेथे, विनोद अलाम, जय पेरसापेन शेतकरी महिला बचत गट ताटीगुडमच्या अध्यक्ष वंदना कोडापे, लक्ष्मण येरावार, सुरेंद्र अलोने, क्षेत्र तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल दहागावकर, लिकेश्वर मार्गिया आदी शेतकरी महिला बचत गटाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
090721\img-20210708-wa0160.jpg
आधुनिक पद्धतीने शेती करून विकास करण्याचे केले आवाहन- भाग्यश्री आत्राम माजी जी प अध्यक्ष