गोटूलद्वारे विकास साधा

By Admin | Updated: December 29, 2014 01:26 IST2014-12-29T01:26:45+5:302014-12-29T01:26:45+5:30

आदिवासी बांधवांच्या एकत्रिकरणाचे ठिकाण म्हणून गोटूलला ओळखले जाते. समाजाचा विकास साधण्याच्या दृष्टीने विचारविनिमयाचे एकमेव ठिकाण...

Develop through Gotul | गोटूलद्वारे विकास साधा

गोटूलद्वारे विकास साधा

घोट : आदिवासी बांधवांच्या एकत्रिकरणाचे ठिकाण म्हणून गोटूलला ओळखले जाते. समाजाचा विकास साधण्याच्या दृष्टीने विचारविनिमयाचे एकमेव ठिकाण म्हणून गोटूलला ओळखले जाते. त्यामुळे आदिवासी बांधवांनी गोटूलच्या माध्यमातून विकासाचे नियोजन करून ते साध्य करावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.
चामोर्शी तालुक्यातील मक्केपल्ली चेक नं. ३ (पुसगुडा) येथे आयोजित गोटून भवन लोकार्पण सोहळा व आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. महेंद्र श्रुंगारपवार, स्वप्नील वरघंटे, परशुराम दुधबावरे, ढिवरू बारसागडे, हेमंत उपाध्ये, हेमाजी कुद्रपवार, सरपंच गिरमा हिचामी, माडेआमगावचे सरपंच मंचू पुंगाटी, पंचायत विस्तार अधिकारी मुद्देमवार, मक्केपल्ली मालचे सरपंच दशरथ कांदो, अरूण बावणे, विलास महा, संतोष पोटावी, सीताराम मन्नो आदी उपस्थित होते.
पुसगुडा परिसरातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. अनेक युवक व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यामुळे शिक्षणावरील त्यांचे लक्ष दुसरीकडे परावर्तीत होत आहे. त्यामुळे पालकांनी याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन सोनटक्के यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अडेटवार तर प्रास्ताविक व आभार विलास महा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी सहकार्य केले.

Web Title: Develop through Gotul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.