ंयेवली गाव अंगठाबहाद्दरमुक्त करण्याचा निर्धार
By Admin | Updated: December 13, 2015 01:41 IST2015-12-13T01:41:20+5:302015-12-13T01:41:20+5:30
यापुढे गावात कुणीही अंगठा लावणार नाही, स्वाक्षरीच करेल, गावातील कुणीही निरक्षर राहणार नाही,

ंयेवली गाव अंगठाबहाद्दरमुक्त करण्याचा निर्धार
सांसद ग्रामात कार्यक्रम : राज्य साधन केंद्र पुणे यांचा पुढाकार
गडचिरोली : यापुढे गावात कुणीही अंगठा लावणार नाही, स्वाक्षरीच करेल, गावातील कुणीही निरक्षर राहणार नाही, हा संदेश सर्वदूर पोहोचविण्यासाठी राज्य साधन केंद्र पुणे यांच्या पुढाकारातून साक्षर भारत योजनेंतर्गत गडचिरोली तालुक्यातील येवली येथे शनिवारी सकाळी संपूर्ण साक्षरता रॅली काढण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी ग्राम पंचायत येवली, साईनाथ विद्यालय येवली, जिल्हा लोक शिक्षण समिती गडचिरोली यांनी पुढाकार घेतला होता. या रॅलीमध्ये शिक्षणाधिकारी (निरंतर) नीलेश पाटील, पं. स. चे सभापती देवेंद्र भांडेकर, येवलीच्या सरपंच गीता सोमनकर, उपसरपंच सुरेखा रूमाजी भांडेकर, पोलीस पाटील लक्ष्मीछाया मेश्राम, सेवा सहकारी संस्थेचे सभापती चोखाजी भांडेकर, मोरेश्वर भांडेकर, ग्रा. पं. सदस्य भीमराव गोवर्धन, मुख्याध्यापक के. के. म्हस्के आदी उपस्थित होते.
सदर रॅलीच्या माध्यमातून येवली गाव १०० टक्के साक्षर करण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन राज्य साधन केंद्र पुणेचे अमोल वाघमारे यांनी केले. या रॅलीमध्ये ४०० विद्यार्थी, ग्रामस्थ सहभागी झाले होते. साईनाथ विद्यालय येवलीपासून रॅलीचा शुभारंभ झाला. इंदिरा गांधी चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मिथून बांबोळे, एस. बी. कुत्तरमारे, सी. पी. भांडेकर, एम. एस. उंदीरवाडे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)