२६ रुग्णांचा दारूमुक्त होण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:40+5:302021-03-15T04:32:40+5:30

गिलगाव येथील शिबिरात १६ तर राजगाटा चक येथील शिबिरात १० अशा एकूण २६ रुग्णांनी गाव पातळीवर आयोजित शिबिरांचा लाभ ...

Determination of 26 patients to be alcohol free | २६ रुग्णांचा दारूमुक्त होण्याचा निर्धार

२६ रुग्णांचा दारूमुक्त होण्याचा निर्धार

गिलगाव येथील शिबिरात १६ तर राजगाटा चक येथील शिबिरात १० अशा एकूण २६ रुग्णांनी गाव पातळीवर आयोजित शिबिरांचा लाभ घेतला. दोन्ही शिबिरात सहभागी रुग्णांना अरुण भोसले यांनी समुपदेशन केले. दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदींची माहिती दिली. यावेळी शिबिर संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेतली तसेच रुग्णांना दारूचे दुष्परिणाम सांगितले. दोन्ही शिबिराचे नियोजन तालुका संघटक अमोल वाकुडकर, तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केले. गिलगाव येथील शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरपंच अशोक कुळमेथे, धनंजय लडके तर राजगाटा शिबिरात पोलीस पाटील खिमदेवी चुधरी, सरपंच यशवंत काळबांधे यांनी सहकार्य केले.

Web Title: Determination of 26 patients to be alcohol free