दोन ड्रम गूळ-मोहफुलांचा सडवा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:35 IST2021-09-13T04:35:55+5:302021-09-13T04:35:55+5:30

ग्लासफाेर्डपेठा येथे गाव संघटनेच्या प्रयत्नांनी अवैध दारूविक्री हद्दपार झाली होती. मात्र, सणानिमित्त दारूविक्री करण्याच्या उद्देशाने गावातील काही नवीन विक्रेत्यांनी ...

Destroy two drums of jaggery | दोन ड्रम गूळ-मोहफुलांचा सडवा नष्ट

दोन ड्रम गूळ-मोहफुलांचा सडवा नष्ट

ग्लासफाेर्डपेठा येथे गाव संघटनेच्या प्रयत्नांनी अवैध दारूविक्री हद्दपार झाली होती. मात्र, सणानिमित्त दारूविक्री करण्याच्या उद्देशाने गावातील काही नवीन विक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. गावात जवळपास चार अवैध दारूविक्रेते असल्याची माहिती गावसंघटनेने दिली. त्यांपैकी दोन दारूविक्रेत्यांवर बामणी पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला आहे. गावातील एका घरी गूळ व मोहफुलांचा सडवा टाकला असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली. त्यानुसार गावसंघटनेच्या महिला व मुक्तिपथ तालुका चमूने एका घरी भेट दिली असता, घराच्या परिसरात १४ हजार रुपये किमतीचा दोन ड्रम सडवा मिळून आला. यावेळी दारूविक्रेत्याच्या हातांनी दोन ड्रम सडवा नष्ट करण्यात आला. तसेच गावात पुन्हा अवैध दारूविक्री केल्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल, अशी समज देण्यात आली.

Web Title: Destroy two drums of jaggery