कोरचीत भाजप-सेना युतीला यश

By Admin | Updated: November 8, 2015 01:37 IST2015-11-08T01:37:25+5:302015-11-08T01:37:25+5:30

कोरची नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक ६ जागांवर विजय मिळविला.

Desired BJP-Army Youth Wrestle | कोरचीत भाजप-सेना युतीला यश

कोरचीत भाजप-सेना युतीला यश

कोरची : कोरची नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक ६ जागांवर विजय मिळविला. तर भारतीय जनता पक्ष, काँग्रेसला प्रत्येकी ३, राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा मिळाल्या तर ३ जागांवर अपक्षांनी बाजी मारली.
कोरची येथील नगर पंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे कोरचा रमेश लालसाय यांनी ६८ मते घेत विजय मिळविला. निवडणुकीत फुलकवर अमिर बेलास यांना ४७ मते तर मडावी धनराज गजरी यांना ६ मते मिळाली. प्रभाग क्रमांक २ मधून काँग्रेसच्या हर्षलता केवल भैसारे यांनी ६३ मते प्राप्त करीत विजय संपादन केला. निवडणुकीत दिलेबाई महेश भानारकर यांना १२ मते, संध्या आनंदराव मेश्राम यांना ४ मते, पत्रीबाई तुकाराम सहारे यांना २ मते तर भारती संघपाल साखरे यांना ३७ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ३ मधून शिवसेनेचे भामानी नसरूद्दीन नुरूद्दीन यांनी ८५ मते घेत विजय मिळविला. तर जाडिया तबरेज अहमदभाई यांना ४ मते, शेंडे नंदकिशोर अंताराम यांना २४ मते, सहारे सबीलाल मेहतर यांना १ मतावर समाधान मानावे लागले. प्रभाग क्रमांक ४ मधून अपक्ष बघवा परदेशी कंगलू यांनी ३१ मते मिळवित विजय संपादन केला. निवडणुकीत ढोरे पुरूषोत्तम भाष्कर यांना ५ मते, बिसेन शैलेंद्र कृष्णकुमार यांना २३ मते, वाढई अनिल दाजी यांना २० मते मिळाली. प्रभाग क्रमांक ५ मधून शिवसेनेच्या केवास हेमिन ग्यानसिंग यांनी ३९ मते घेत विजय मिळविला. बखर सुमनबाई बन्सोर यांना निरंक तर मडावी दुर्गाबाई झगरू यांना ७ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ६ मधून शिवसेनेचे नायक अरूण विष्णू यांनी ७६ मते घेत विजय संपादन केला. निवडणुकीत गुरनुले विठ्ठल डोमाजी यांना ३ मते, मेश्राम गुरूदेव झाडूराम यांना ९ मते, मोहुर्ले भजनराव तुळशिराम यांना १० मते तर वैरागडे नंदकिशोर राजाराम यांना २६ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ७ मधून काँग्रेसचे श्यामलाल पांडु मडावी यांनी ४७ मते घेत विजय मिळविला तर सुंदरू सोमजी नैताम यांना ४१ मतांवर समाधान मानावे लागले. प्रभाग क्रमांक ८ मधून अपक्ष राऊत हिरालाल पांडुरंग यांनी ३७ मते घेत विजय संपादन केला. निवडणुकीत अंबादे चंद्रशेखर पांडुरंग यांना निरंक, अंबादे श्रावण काशिराम यांना ९ मते, चौबे आनंदराव फुलचंद यांना ३२ मते, सहारे सबीलाल मेहतर यांना निरंक, साखरे ईश्वरलाल राधेशाम यांना ३ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ९ मधून भारतीय जनता पक्षाच्या केशरबाई विलास अंबादे यांनी ४० मते घेत विजय मिळविला तर कल्पना मोरेश्वर कराडे यांना १४ मते, विद्या राजेंद्र भैसारे यांना २४ मते, हेमलता इंद्रपाल भैसारे यांना २० मते तर अपर्णा काशिनाथ मेश्राम यांना निरंक मते मिळाली. प्रभाग क्रमांक १० मधून शिवसेनेच्या असवंतीन गोवर्धन सोनार यांनी ३७ मते घेत विजय मिळविला तर रोशनी ब्रह्मानंद बागडेरिया यांना ३४ मतांवर समाधान मानावे लागले. प्रभाग क्रमांक ११ मधून काँग्रेसचे मेघश्याम बिधून जमकातन यांनी ५५ मते घेत विजय मिळविला. तर श्रवणकुमार सरजूराम जमकातन यांना ४६ तर सुयोग शालिग्राम पेंदोर यांना १४ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १२ मधून शिवसेनेच्या ज्योतीबाई चुन्नु नैताम यांनी ६४ मते घेत विजय मिळविला. तर ताराबाई चुमेन नैताम यांना २४ व तुफानबाई चंदरसाय मडावी यांना २० मते मिळाली. प्रभाग क्रमांक १३ मधून शिवसेनेच्या निराशा प्रदीप गावतुरे यांनी ३४ मते घेत विजय संपादन केला तर आशाबाई अमितकुमार गुरव यांना १२ मते, मनीषा राष्ट्रपाल नखाते यांना २८ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शारदा श्रीराम नैताम यांनी ४७ मते घेत विजय मिळविला तर सुलताना रमेश पोरेटी यांना ४१ मतांवर समाधान मानावे लागले. प्रभाग क्रमांक १५ मधून भारतीय जनता पक्षाचे नीलकमल केशव मोहुर्ले यांनी ४८ मते घेत विजय मिळविला. तर रेहाना शरिफखॉ पठाण यांना ३२ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १६ मधून भाजपचे कमलनारायण रामअवतार खंडेलवाल यांनी ५८ मते घेत दणदणीत विजय मिळविल तर विनोद हरिश्चंद गुरनुले यांना ७, संतोष मनिराम मोहुर्ले यांना ६, मधुकर मारोती शेंडे यांना ११ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १७ मधून अपक्ष प्रियतमा खुशाल जेंगठे यांनी ४३ मते घेत विजय संपादन केला. तर शुभांगी मोहुर्ले यांना २२ मते, सत्यभामा मोहुर्ले यांना २४ मतांवर समाधान मानावे लागले.

Web Title: Desired BJP-Army Youth Wrestle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.