देसाईगंजची रूग्णवाहिका २२ दिवसांपासून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 01:02 IST2017-04-26T01:02:15+5:302017-04-26T01:02:15+5:30

स्थानिक ग्रामीण रूग्णालयाची रूग्णवाहिका मागील २२ दिवसांपासून बेपत्ता आहे.

DesaiGanj's ambulance has disappeared for 22 days | देसाईगंजची रूग्णवाहिका २२ दिवसांपासून गायब

देसाईगंजची रूग्णवाहिका २२ दिवसांपासून गायब

सावंगीचा रूग्ण दगावला : प्राथमिक आरोग्य केंद्रावर कारभार अवलंबून
देसाईगंज : स्थानिक ग्रामीण रूग्णालयाची रूग्णवाहिका मागील २२ दिवसांपासून बेपत्ता आहे. रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण रूग्णालयाला परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेच्या आधारावर काम करावे लागत आहे. रूग्णवाहिकेविना एका अपघातग्रस्त रूग्णाचा जीव गेला. मात्र आरोग्य यंत्रणेला याचे काहीही सोयरसुतक नाही.
गतवर्षी मिळालेल्या या रूग्णवाहिकेत बिघाड आल्यामुळे मागील २२ दिवसांपासून ग्रामीण रूग्णालय रूग्णवाहिकाविना आहे. रूग्णवाहिका नसल्यामुळे आरोग्य सेवा कोलमडली आहे. देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथे २४ एप्रिलच्या रात्री अज्ञात वाहनाच्या धकेत साजन बापुराव गुरनुले (२०) व मंगेश लोणबले (२४) हे दोघे जखमी झाले. नागरिकांनी आॅटोमधून दोघांनाही ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र साजन गंभीर असल्याने त्याला गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविने आवश्यक होते. ग्रामीण रूग्णालय प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिका बोलावली. मात्र येण्यास बराच कालावधी लागला. त्यामुळे साजनचा जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत्यू झाला. रूग्णवाहिका वेळीच उपलब्ध झाली असती तर साजनचा प्राण वाचला असता, अशी माहिती सावंगी येथील नागरिकांनी दिली आहे. या संदर्भात प्रभारी वैद्यकीय अधिकारी गौरव सहारे यांना विचारणा केली असता, रूग्णवाहिकेसाठी अनेक पत्रव्यवहार झाले. मात्र भंगार रूग्णवाहिका रूग्णालयाला देण्यात येत आहे. त्यातूनच आम्ही जिल्हा सामान्य रूग्णालयाला अत्यावस्थ रूग्ण पाठवितो, अशी माहिती दिली. (वार्ताहर)

Web Title: DesaiGanj's ambulance has disappeared for 22 days