देसाईगंजचे कारले दुबईत

By Admin | Updated: September 6, 2016 00:55 IST2016-09-06T00:55:46+5:302016-09-06T00:55:46+5:30

देसाईगंज तालुक्यातील शेतकरी आता नगदी पिकांकडे वळला असून तालुक्याच्या ठिकाणी दररोज परिसरातील शेकडो क्विंटल कारल्याचा माल बाजारपेठेत येत आहे.

DesaiGanj karle Dubai | देसाईगंजचे कारले दुबईत

देसाईगंजचे कारले दुबईत

२० किलोचे पॉकेट बनविले : नागपूरवरून शारजाला होतात रवाना
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील शेतकरी आता नगदी पिकांकडे वळला असून तालुक्याच्या ठिकाणी दररोज परिसरातील शेकडो क्विंटल कारल्याचा माल बाजारपेठेत येत आहे. तो नागपूर मार्गे सरळ दुबई येथे रवाना होत असल्याची माहिती ठोक व्यापारी रमेश चुऱ्हे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
सध्या देसाईगंज तालुका भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असून कोबी हे पीक वगळता इतर सर्व भाजीपाला परिसरातच उत्पादीत होत असल्याने रोज सकाळी ठोक माल विक्रीसाठी परिसरातील शेतकरी सकाळीच बाजारपेठेत दाखल होत आहेत. त्यादृष्टीने सर्वात फायदेशीर पीक म्हणून कारले पिकाकडे बघितले जाते. रबी व खरीप या दोन्ही हंगात कारल्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. दररोज शेकडो क्विंटल कारले बाजारपेठेत येत असून इतर भाजीपाल्यापेक्षा कारल्याला अधिक भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. आलेला माल ठोक व्यापाऱ्याला विकून तो २० किलो ग्रॅमच्या बॅगमध्ये पॅक करून ट्रकच्या माध्यमातून नागपूर मार्गे दुबईच्या शारजा येथे पाठविला जात आहे, अशी माहिती चुऱ्हे यांनी दिली. नागपूरच्या बाजारपेठेत देसाईगंजच्या कारल्यांना मोठी मागणी असून अतिशय चवदार व स्वादीष्ट कारले म्हणून देसाईगंजचे कारले प्रसिध्द आहेत. (तालुका प्रतिनिधी)

सणाच्या तोंडावर भाजीपाल्याची मागणी वाढली
गणेश चतुर्थी व त्यानंतर लगेच येणाऱ्या गौरी पुजन यामुळे सध्या चिल्लर बाजारात भाज्यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सणासुदीच्या काळात गडचिरोली येथील गुजरी बाजारात ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर भाजीपाला येतो. तरीही भाव वधारलेलेच आहे. गत आठवड्यापेक्षा काही प्रमाणात दर घसरल्याचे दुकानदार सांगतात.

Web Title: DesaiGanj karle Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.