अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत अहेरीत मार्गदर्शन
By Admin | Updated: March 8, 2015 01:00 IST2015-03-08T01:00:48+5:302015-03-08T01:00:48+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे स्थानिक भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे विद्यार्थ्यांना गुरूवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करण्यात आले.

अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत अहेरीत मार्गदर्शन
अहेरी : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे स्थानिक भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे विद्यार्थ्यांना गुरूवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विज्ञान परिषद अध्यक्ष तथा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका संघटक प्रा. विजय खोंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, जगदीश बदरे, प्रा. पंडरीनाथ बरडे, प्राचार्य अनिल कत्रोजवार, विष्णू सोनोने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. माधमशेट्टीवार यांनी पर्यावरणाचे संतुलन ठेऊन निसर्गसृष्टीचे व पुढील पिढ्यांचे संरक्षण कसे करता येईल, हे पॉवर पार्इंटद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रास्ताविक प्रा. रमेश हलामी, संचालन जयश्री खोंडे तर आभार प्रा. आनंद अलोणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. शामल बिश्वास, प्रा. अतुल खोब्रागडे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)