वंचित आघाडी जिल्ह्यात विकल्प उभा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:23+5:302021-07-23T04:22:23+5:30
गडचिरोली जिल्हा दौऱ्या दरम्यान सर्किट हाऊस येथे २१ जुलै आयोजित आढावा बैठकीनंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी ...

वंचित आघाडी जिल्ह्यात विकल्प उभा करणार
गडचिरोली जिल्हा दौऱ्या दरम्यान सर्किट हाऊस येथे २१ जुलै आयोजित आढावा बैठकीनंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, महिला आघाडीच्या राज्य महासचिव डाॅ. अरुंधती शिरसाठ, केंद्रीय समितीचे सदस्य राजू लोखंडे, राज्य कार्यकारिणीचे सदस्य कुशाल मेश्राम, पूर्व विदर्भ समन्वय समितीचे संयोजक डाॅ. रमेशकुमार गजभिये, अरविंद सांदेकर, राजू झोडे, किशोर कॅथेल, हंसराज बडोले व जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे उपस्थित होते.
पुढे बोलताना ठाकूर म्हणाल्या, वंचित बहुजन आघाडीने मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवून अस्तित्व निर्माण केले आहे. आजच्या घडीला वंचित बहुजन आघाडी पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून चर्चिला जात आहे. राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता स्थापन झाली तर वंचित बहुजन आघाडी एक नंबरचा पक्ष व्हायला वेळ लागणार नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी काही तरुणांनी पक्षात पक्ष प्रवेश केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बांबोळे, महासचिव कैलाश फुलझेले, कोषाध्यक्ष गजानन बारसिंगे, संघटक धर्मेंद्र गोवर्धन, संघटक जगन्नाथ बन्सोड, सचिव देवानंद दुर्गे, सचिव पीतांबर रामटेके, पुरुषोत्तम बांबोळे, मालाताई भजगवळी, अमिता मडावी, अर्चना चुधरी, पंकज साखरे, दुशांतवाटगुरे, पिंटू रामटेके, एन.आर. रामटेके, मनोज धायवान, सीताराम टेंभूर्णे मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.