गडचिरोलीत बहिष्कारामुळे टक्केवारी घसरली
By Admin | Updated: October 15, 2014 23:18 IST2014-10-15T23:18:01+5:302014-10-15T23:18:01+5:30
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सरासरी ६८ ते ७० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. चामोर्शी परिसरातील अनेक गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतरही या भागात

गडचिरोलीत बहिष्कारामुळे टक्केवारी घसरली
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सरासरी ६८ ते ७० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. चामोर्शी परिसरातील अनेक गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतरही या भागात अत्यल्प मतदान झाले. चामोर्शी तालुक्यात कुनघाडा रै टोली बुथ क्रमांक १७८ मध्ये एकूण ८६७ मतदारांपैकी २८ जणांनी मतदान केले. यात २१ पुरूष व ७ महिला मतदारांचा समावेश होता. कुनघाडा टोली येथे ३.२२ टक्के मतदान झाले. कुनघाडा बुथ क्रमाक १७७ मध्ये एकूण १ हजार ३२ मतदारांचा समावेश आहे. यापैकी १०९ जणांनी मतदान केले. यात ६२ पुरूष व ४७ स्त्री मतदारांचा समावेश आहे. मतदानाची टक्केवारी १०.७७ टक्के आहे. कुनघाडा बुथ क्रमांक १७९ मध्ये ८३४ मतदारांपैकी केवळ १२ जणांनी मतदान केले. यात १० पुरूष व २ स्त्री मतदारांचा समावेश आहे. येथील मतदानाची टक्केवारी १.४४ टक्के आहे. कुनघाडा बुथ क्रमांक १८० मध्ये ११६७ मतदारांपैकी ३० जणांनी मतदान केले. येथील मतदानाची टक्केवारी २.५ टक्के आहे. बुथ क्रमांक १८१ मध्ये एकूण ९७० मतदारांपैकी २८ पुरूष व १८ स्त्रियांनी मतदान केले. येथील मतदानाची टक्केवारी ४.७ टक्के आहे. मालेरचक येथे ५३५ मतदारांपैकी २०१ मतदारांनी मतदान केले. तळोधी (मो.) येथे ८१० मतदारांपैकी ४५४ मतदारांनी मतदान केले. बुथ क्रमांक १८६ मध्ये ७१० मतदारांपैकी ३०९ जणांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ४३.५२ टक्के आहे. बुथ क्रमांक १८७ मध्ये ११९२ मतदारांपैकी ४५० जणांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ३४.८४ टक्के आहे. तळोधीत एकूण २ हजार ७११ मतदारांपैकी १ हजार १७८ जणांनी मतदान केले. येथील टक्केवारी ४३.४५ टक्के आहे.