पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या मुद्यावर निदर्शने
By Admin | Updated: April 7, 2016 01:17 IST2016-04-07T01:17:29+5:302016-04-07T01:17:29+5:30
भाजप प्रणित केंद्र सरकारने सर्वसामान्य व मध्यमवर्गीय लोकांचा कुठलाही विचार न करता वर्षातून अनेकदा पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली आहे.

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या मुद्यावर निदर्शने
भाजपकडून सर्वसामान्यांची दिशाभूल : सरकारच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर
गडचिरोली : भाजप प्रणित केंद्र सरकारने सर्वसामान्य व मध्यमवर्गीय लोकांचा कुठलाही विचार न करता वर्षातून अनेकदा पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली आहे. मंगळवारी केंद्रसरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात आणखी तीन रूपयांनी वाढ केली. या दरवाढीच्या मुद्यावर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात बुधवारी येथील इंदिरा गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान भाजप प्रणित केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करीत आहे, असा प्रखर आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी केला.
या निदर्शनाचे नेतृत्त्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सरचिटणीस हसनअली गिलानी, ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, रवींद्र दरेकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, युकाँचे नेते पंकज गुड्डेवार, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले.
भाजप प्रणित केंद्र सरकारच्या विरोधात प्रखर शब्दांत नारेबाजी करून तसेच बॅनर झळकवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनहितवादी धोरणाचा काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध केला. काँग्रेसच्या भांडवलदारहिताच्या धोरणामुळे गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र व भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी होत आहे, अशी टिका माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी यावेळी केली.
याप्रसंगी जि. प. सदस्य केसरी उसेंडी, नंदू वाईलकर, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, पी. आर. आकरे, वैभव भिवापुरे, विजय शातलवार, आरती लहरी, पं. स. सदस्य जास्वंदा करंगामी, मंगला कोवे, सी. बी. आवळे, पी. टी. मसराम, अमिता मडावी, प्रतिभा जुमनाके, बालाजी गावळे, मिलींद खोब्रागडे, रजनीकांत मोटघरे, नीतेश राठोड, ज्योती गव्हाणे, मंदा तुरे, रेखा मडावी, जि. प. सदस्य शांता परसे, प्रेमिला कुमरे, सुनंदा कटकमवार, चंदू वडपल्लीवार आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.