अहेरी कोर्टासमोर निदर्शने; आरोपीची कोठडीत रवानगी

By Admin | Updated: December 16, 2014 22:52 IST2014-12-16T22:52:35+5:302014-12-16T22:52:35+5:30

भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील २२ वर्षीय युवती संगिता जोगा मडावी हिला जाळून मारल्या प्रकरणी वनरक्षक पदावर कार्यरत आरोपी मनोज सखाराम सडमेक याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी,

Demonstrations against Aheri courts; The accused will be remanded in custody | अहेरी कोर्टासमोर निदर्शने; आरोपीची कोठडीत रवानगी

अहेरी कोर्टासमोर निदर्शने; आरोपीची कोठडीत रवानगी

वनरक्षकाने युवतीला जाळल्याचे प्रकरण
अहेरी : भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील २२ वर्षीय युवती संगिता जोगा मडावी हिला जाळून मारल्या प्रकरणी वनरक्षक पदावर कार्यरत आरोपी मनोज सखाराम सडमेक याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी अहेरी येथील तालुका न्यायालयासमोर आज शेकडो आंदोलक व मृतक युवतीच्या नातलगांनी ठिय्या आंदोलन केले. यानंतर सदर आरोपीचे वकीलपत्र घेण्यास कुणीही विधीज्ज्ञ धजावले नाहीत. त्यामुळे आरोपी मनोज सखाराम सडमेकला अहेरी येथील तालुका न्यायालयाच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
संगीता जोगा मडावी या युवतीची हत्या आरोपी वनरक्षक मनोज सखाराम सडमेक याने केली. या प्रकरणी त्याच्या विरोधात अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज मृत मुलीचे वडील जोगा व्यंका मडावी, काका सिताराम व्यंका मडावी, सामाजिक कार्यकर्ते रामशहा पोचम मडावी, पं.स. सदस्य ऋषी पोरतेट, कैलाश कोरेत, संतोष आत्राम आदींसह शेकडो नागरिकांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्या या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. दुपारी २.३० वाजतापासून आंदोलन सुरू झाले. दरम्यान दुपारी ३ वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून असलेल्या अहेरी न्यायालयात आरोपीला पोलिसांनी हजर करताच आंदोलकांचा लोंढा कोर्टाच्या दिशेने वळला. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात आल्यावर अतिरिक्त पोलीस कुमक बोलाविण्यात आली. यावेळी आरोपीचे वकीलपत्र घेणाऱ्या वकीलाच्या विरोधात नारेबाजी आंदोलकांनी केली. त्यानंतर सर्व वकीलांनी आरोपी मनोज सडमेकचे वकीलपत्र नाकारले व दुपारी ४ वाजेपर्यंत शेकडो नागरिक न्यायालयाच्या बाहेर परिसरात ठिय्या मांडून होते. आरोपी पोलीस कोठडीत रवाना झाल्यानंतर आंदोलक पांगण्यास सुरूवात झाली.

Web Title: Demonstrations against Aheri courts; The accused will be remanded in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.