तीन केंद्रांवर कोरोना लसीकरणाचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST2021-01-09T04:30:44+5:302021-01-09T04:30:44+5:30
लसीकरणावेळी आवश्यक ती तयारी, घ्यावयाची खबरदारी याबाबतची महिती उपस्थित आरोग्य यंत्रणेला देण्यात आली. या लसीकरण कक्षात सॅनिटायझर, प्राथमिक तपासणी, ...

तीन केंद्रांवर कोरोना लसीकरणाचे प्रात्यक्षिक
लसीकरणावेळी आवश्यक ती तयारी, घ्यावयाची खबरदारी याबाबतची महिती उपस्थित आरोग्य यंत्रणेला देण्यात आली. या लसीकरण कक्षात सॅनिटायझर, प्राथमिक तपासणी, नोंदणी, प्रतीक्षा कक्ष, प्रत्यक्ष लसीकरण कक्ष व देखरेख कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात उपविभागीय तसेच तालुकास्तरावर संपूर्ण सुरक्षेचे पालन व पारदर्शक अंमलबजावणीसंदर्भात बैठका घेण्यात येत आहेत. नागरिकांनीसुध्दा शासन आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. सोशल मिडीया किंवा इतर माध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीश सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, डॉ.विनोद म्हशाखेत्री, डॉ.बागराज धुर्वे, डॉ.माधुरी किलनाके, डॉ.मुकुंद ढबाले, डॉ.पंकज हेमके, डॉ. इंद्रजित नागदेवते, डॉ. अनुपम महेशगौरी, विनोद देशमुख व इतर कर्मचारी उपस्थित होते.
(बॉक्स)
यांना मिळेल आधी लस
प्रत्यक्ष लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर जसे की, पोलीस, अग्निशमन दल, महसूल यंत्रणा आदी विभाग, तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील पूर्व व्याधीग्रस्त नागरिक आणि चौथ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांचा समावेश राहणार आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या काळात सर्वांनी अतिशय उत्तम काम केल्याचे यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले.