लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली :
By Admin | Updated: December 13, 2015 01:27 IST2015-12-13T01:27:35+5:302015-12-13T01:27:35+5:30
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपनाथजी मुंडे यांना गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे शनिवारी सायंकाळी भाजपच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली :
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपनाथजी मुंडे यांना गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे शनिवारी सायंकाळी भाजपच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, भाजप नेते अनिल करपे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे आदींसह शेकडो नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राच्या विकासात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. बहुजनांच्या हितासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले, असेही ते म्हणाले.