विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ११ ला चक्काजाम आंदोलन

By Admin | Updated: January 10, 2017 00:58 IST2017-01-10T00:58:06+5:302017-01-10T00:58:06+5:30

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ११ जानेवारी रोजी बुधवारला सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्ह्याच्या विविध भागात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, ...

For the demand of Vidarbha State, the 11th Chakkajam Movement | विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ११ ला चक्काजाम आंदोलन

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ११ ला चक्काजाम आंदोलन

गडचिरोली : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ११ जानेवारी रोजी बुधवारला सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्ह्याच्या विविध भागात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे गडचिरोली जिल्हा समन्वयक अरूण पाटील मुनघाटे यांनी दिली आहे.
बुधवारी गडचिरोलीसह सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, आष्टी, येनापूर, चामोर्शी, घोट, पोर्ला, आरमोरी, कोंढाळा, देसाईगंज, कुरखेडा, पुराडा येथे तसेच इतरही ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. सदर रस्ता रोको आंदोलनात विदर्भवाद्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अरूण पाटील मुनघाटे, राजेंद्रसिंह ठाकूर, समय्या पसुला, रघुनाथ तलांडे, दीपक हलदर, प्रतिभा चौधरी, आशा पोहणेकर, यशोदा गुरनुले, वैष्णवी राऊत, लक्ष्मी दंडकेवार, मनीषा सज्जनपवार, परशुराम सातार, मनमोहन बंडावार, रामभाऊ कोमेरा, शालिक नाकाडे, रमेश उप्पलवार, चंद्रशेखर भडांगे, चंद्रशेखर गडसुलवार, अशोक पोरेड्डीवार, विलास रापर्तीवार, गोवर्धन चव्हाण, राहुल अंबादे, गौरव नागपुरकर, दीपक दुर्गे आदींनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: For the demand of Vidarbha State, the 11th Chakkajam Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.