थकीत बुडीत मजुरी देण्याची मागणी
By Admin | Updated: September 26, 2015 01:33 IST2015-09-26T01:32:59+5:302015-09-26T01:33:41+5:30
गरोदर मातांना बुडीत मजुरीपासून वंचित ठेवणाऱ्या संवर्ग विकास अधिकारी एटापल्ली यांच्यावर कारवाई करावी,...

थकीत बुडीत मजुरी देण्याची मागणी
अधिकाऱ्यांवर कारवाई करा : महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
एटापल्ली : गरोदर मातांना बुडीत मजुरीपासून वंचित ठेवणाऱ्या संवर्ग विकास अधिकारी एटापल्ली यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदारांच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
मानव विकास मिशनच्या मार्फतीने गरोदर व स्तनदा मातांना प्रत्येक चार हजार रूपये अनुदान दिले जाते. सदर अनुदान संवर्ग विकास अधिकारी यांच्यामार्फतीने वितरित केले जाते. मात्र पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे सदर थकीत मजुरी दोन वर्षांचा कालावधी उलटूनही मिळाली नाही. अनुसूचित जाती, जमाती व गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे बुडीत मजुरीपासून महिलांना वंचित राहावे लागले आहे. मजुरी न देण्यासाठी जबाबदार असलेल्यावर कारवाई करावी, अशी मागणी नाविण्य करमकर, कल्पना मुप्पलवार, राधा पुंगाटी, ममता गोंगले, स्वरूपा दुर्गे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)