कुरखेडात अचानक वाढली मिठाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:01 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:01:15+5:30

सोमवारपर्यंत कुरखेडा येथील किराणा विक्रेत्यांकडे पुरेशा प्रमाणात मिठाचा साठा उपलब्ध होता. मात्र मंगळवारी अचानक मिठाची मागणी वाढली. या संधीचा गैरफायदा उचलत काही विक्रेत्यांनी चढत्या दरात मिठाची विक्री केली. मिठाचा तुटवडा भासणार नाही. नागरिकांनी अनावश्यक साठा करू नये. तसेच विक्रेत्यांनीही छापील दरापेक्षा अधिकच्या दराने विक्री करू नये, असे आवाहन नगर पंचायतीच्या वतीने ध्वनीक्षेपकाने करण्यात आले.

Demand for salt suddenly increased in Kurkheda | कुरखेडात अचानक वाढली मिठाची मागणी

कुरखेडात अचानक वाढली मिठाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा/ धानोरा : छत्तीसगड राज्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाला असल्याच्या माहितीवरून कुरखेडा बाजारपेठेत मंगळवारी अचानक मिठाची मागणी वाढली. त्यामुळे मीठ खरेदीसाठी अचानक नागरिकांची गर्दी वाढली आहे.
सोमवारपर्यंत कुरखेडा येथील किराणा विक्रेत्यांकडे पुरेशा प्रमाणात मिठाचा साठा उपलब्ध होता. मात्र मंगळवारी अचानक मिठाची मागणी वाढली. या संधीचा गैरफायदा उचलत काही विक्रेत्यांनी चढत्या दरात मिठाची विक्री केली. मिठाचा तुटवडा भासणार नाही. नागरिकांनी अनावश्यक साठा करू नये. तसेच विक्रेत्यांनीही छापील दरापेक्षा अधिकच्या दराने विक्री करू नये, असे आवाहन नगर पंचायतीच्या वतीने ध्वनीक्षेपकाने करण्यात आले.

चातगावात मीठ खरेदीसाठी वाहनांच्या रांगा
मिठाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा धानोरा तालुक्यातही निर्माण झाली. त्यामुळे धानोरा, मुरूमगाव, चातगाव येथील दुकानदारांकडे मीठ खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. एक व्यक्ती ३० किलो वजनाच्या दोन बॅग खरेदी करीत होता. विशेष म्हणजे, अधिकचे पैसे देऊन ग्राहक मीठ खरेदी करीत होते. चातगाव येथील एका ठोक व्यापाऱ्याकडे मीठ खरेदीसाठी दुकानदारांच्या गाड्या लागल्या होत्या. मुरूमगाव येथे मंगळवारी आठवडी बाजार होता. बाजारात येणारे नागरिकही इतर साहित्य न नेता मिठाच्या मोठ्या बॅग धरून जात होते. याबाबत धानोरातील दुकानदारांना विचारणा केली असता, मिठाची टंचाई अजिबात नाही. मात्र नागरिकांमुळे मिठाची कृत्रीम टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली.

मिठाचा तुटवडा नाही
गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातून रेल्वेद्वारे गोंदिया व देसाईगंज येथे मिठाचा पुरवठा होतो. त्यानंतर ट्रकद्वारे एजन्सीधारकांना मिठाचा पुरवठा केला जाते. जिल्ह्यात मिठाचा तुटवडा नाही. अचानक मागणी वाढल्याने मिठ संपले आहे. नागरिकांनी अनावश्यक मिठाचा साठा करू नये. बाजारपेठेत लवकरच मीठ उपलब्ध होईल, अशी माहिती कुरखेडा येथील किराणा व्यावसायिक विवेक निरंकारी यांनी दिली.

Web Title: Demand for salt suddenly increased in Kurkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.