सीडीवर्कजवळ रस्ता बांधकामाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:37 IST2021-04-27T04:37:11+5:302021-04-27T04:37:11+5:30

त्यामुळे सीडीवर्कजवळ रस्ता बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सन २०१८-१९ या वर्षात साेनेरांगी, सुकाळा या पाणंद रस्त्यावर ...

Demand for road construction near CDwork | सीडीवर्कजवळ रस्ता बांधकामाची मागणी

सीडीवर्कजवळ रस्ता बांधकामाची मागणी

त्यामुळे सीडीवर्कजवळ रस्ता बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सन २०१८-१९ या वर्षात साेनेरांगी, सुकाळा या पाणंद रस्त्यावर सुकाळा गावापासून थाेड्या अंतरावर गाव तलावाच्या अंतर्गत भागात सीडीवर्कचे बांधकाम करण्यात आले. पण, या ठिकाणी बांधलेला पूल अंदाजपत्रापेक्षा लहान बांधण्यात आला. या कामात आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला, असा आराेप या भागातील नागरिकांनी केला आहे. बांधलेला पूल लहान आहे. जंगलातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने सीडीवर्कजवळचा संपूर्ण रस्ता तुटला आहे. साेनेरांगी-सुकाळा पाणंद रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गाने आवागमन करणाऱ्या नागरिकांची फजिती हाेत आहे. प्रशासनाच्या नियाेजनशून्यतेमुळे रस्त्याची अशी दैनावस्था झाल्याचे नागरिकांमध्ये बाेलले जात आहे. सीडीवर्कनजीक तुटफूट झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सुकाळा व साेनेरांगी येथील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Demand for road construction near CDwork