सुकाळातील प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST2021-08-12T04:41:37+5:302021-08-12T04:41:37+5:30
वैरागड : वैरागड-देलनवाडी मार्गावरील मोहझरी जवळील सुकाळा या फाट्यावर मागील १५ वर्षांपूर्वी प्रवासी निवारा बांधण्यात आला होता ; पण ...

सुकाळातील प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी
वैरागड : वैरागड-देलनवाडी मार्गावरील मोहझरी जवळील सुकाळा या फाट्यावर मागील १५ वर्षांपूर्वी प्रवासी निवारा बांधण्यात आला होता ; पण निकृष्ट बांधकामामुळे हा प्रवासी निवारा अल्पावधीत जीर्णावस्थेत आहे. ताे नष्ट हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या प्रवाशांना झाडाच्या आडोशाला उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागते.
वैरागड येथून देलनवाडी, मानापूर पुढे अंगारा, मालेवाडा या गावांना जोडणारा हा मुख्य मार्ग असून, या मार्गाला नेहमी वाहनांची वर्दळ असते. या मार्गाने आरमोरी किंवा जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी मोहझरी, सुकाळा व शिवणी येथील नागरिक या प्रवासी निवारा जवळ थांबून वाहनाची प्रतीक्षा करीत उभे राहतात ; परंतु या निवाराची कमालीची दुरवस्था झाली आहे. येथे प्रवाशांना बसायला योग्य अशी जागा नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल हाेत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.