स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनात्मक उपक्रम राबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:37 IST2021-03-26T04:37:24+5:302021-03-26T04:37:24+5:30
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक दिसून येते. परंतु अजूनही स्पर्धा परीक्षेबाबत ग्रामीण भागात आवश्यक प्रमाणात ...

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनात्मक उपक्रम राबविण्याची मागणी
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक दिसून येते. परंतु अजूनही स्पर्धा परीक्षेबाबत ग्रामीण भागात आवश्यक प्रमाणात जागृती झाली नाही. शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेक कोचिंग क्लासेस सुरू आहेत. परंतु ग्रामीण भागात मात्र याबाबत अद्याप माहिती दिली जात नाही. परिणामी ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेच्या जागृतीसाठी उपक्रम राबवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातही पालक मुलांच्या शिक्षणासाठी जागरूकता दाखवीत आहेत, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनापासून वंचित राहत आहेत. सिराेंचा तालुक्यात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत फारशी माहिती नाही. अर्ज कुठे करायचा, परीक्षा कुठे होते याबद्दल अनेकांना माहिती नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेबाबत ग्रामीण भागात जागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. मार्गदर्शनाअभावी सिराेंचा तालुक्यासह दुर्गम भागातील अनेक विद्यार्थी माघारत आहेत.