आसरअल्ली आराेग्य पथकातील रिक्त पदे भरण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST2021-03-13T05:05:55+5:302021-03-13T05:05:55+5:30

अंकिसा : सिराेंचा तालुक्यातील आसरअल्ली आराेग्य पथकातील रिक्त पदे लवकर भरावीत, अशी मागणी येथील नागरिकांनी जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे ...

Demand to fill vacancies in Asaralli Health Squad | आसरअल्ली आराेग्य पथकातील रिक्त पदे भरण्याची मागणी

आसरअल्ली आराेग्य पथकातील रिक्त पदे भरण्याची मागणी

अंकिसा : सिराेंचा तालुक्यातील आसरअल्ली आराेग्य पथकातील रिक्त पदे लवकर भरावीत, अशी मागणी येथील नागरिकांनी जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. रिक्त पदांमुळे याेग्य उपचार हाेत नसल्याने अनेक रुग्ण तेलंगणा राज्यात जात आहेत. आसरअल्ली आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, महिला व पुरुष सफाई कामगार, परिचर व आरोग्य सहायकांची पदे रिक्त आहेत. मागील सहा महिन्यांपासून ही पदे रिक्त आहेत. रिक्त असलेल्या पदांवर काेणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. काेराेनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे व याेग्य उपचार हाेत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोग्य पथकांतर्गत येणाऱ्या सुंकरअल्ली, मोटलाटेकडा, मुत्तापूर माल, मुत्तापूर चेक, सोमनूर जुने, सोमनूर नवीन, मुक्किडीगुट्टा, गुंमलकोंडा, सोमनपल्ली आदी गावातील जवळपास १३ हजार लाेकांना आसरअल्ली आराेग्य पथकात उपचार मिळत हाेते. परंतु, आता रिक्त पदांमुळे तेलंगणा राज्यात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. यासाठी नागरिकांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. आसरअल्ली येथे स्थायी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची १५ दिवसांच्या आत नियुक्ती करावी अन्यथा आंदोलन करुन प्राथमिक आरोग्य पथकाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा धर्मराजू वडलाकोंडा, श्रीकांत सुगरवार, रमाकांत गग्गुरी आदींनी दिला आहे.

Web Title: Demand to fill vacancies in Asaralli Health Squad