राेहयाेचा कुशल निधी वितरित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:36 IST2021-04-25T04:36:15+5:302021-04-25T04:36:15+5:30

ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळावा व त्यांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाची रोजगार हमी योजना आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ...

Demand for efficient distribution of funds | राेहयाेचा कुशल निधी वितरित करण्याची मागणी

राेहयाेचा कुशल निधी वितरित करण्याची मागणी

ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळावा व त्यांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाची रोजगार हमी योजना आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये सिमेंट रोड, नाली बांधकाम, सिमेंट बंधारे, मोरी बांधकाम, पूल, आदी विविध प्रकारची कुशल कामे करण्यात आली. ग्रामपंचायतस्तरावर होणाऱ्या विकास कामाच्या बांधकामाला साहित्य पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कमी रेटने साहित्य पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना हे काम देण्यात आले. पुरवठादारांकडून ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या कुशल कामांना सिमेंट, लोहा, गिट्टी व इतर साहित्याचा पुरवठा करण्यात आला. विविध ग्रामपंचायतींमध्ये नरेगा अंतर्गत विविध कुशलची कामे करण्यात आली. मात्र, कुशल कामांना साहित्य पुरवठा करणाऱ्या अनेक पुरवठादारांचे काेट्यवधी रुपयांच्या साहित्याचे बिल गेल्या दाेन ते तीन वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे.

Web Title: Demand for efficient distribution of funds