वैरागड येथील शिवकालीन बंधाऱ्याची भिंत नष्ट करण्याची मागणी
By Admin | Updated: May 20, 2015 02:13 IST2015-05-20T02:12:43+5:302015-05-20T02:13:21+5:30
वैरागडजवळील सती नदीच्या पात्रात शिवकालीन बंधऱ्याचे बांधकाम करण्यात आले

वैरागड येथील शिवकालीन बंधाऱ्याची भिंत नष्ट करण्याची मागणी
वैरागड : वैरागडजवळील सती नदीच्या पात्रात शिवकालीन बंधऱ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र सदर बांधकाम चुकीच्या पद्धतीने झाले असल्याने याचा फटका सती नदीच्या पात्राला बसत आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची नष्ट करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वैरागड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सती नदीवर सुमारे ४१ लाख रूपये खर्च करून शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे नदीतील वाहून जाणारे पाणी अडून सभोवतालची भूजल पातळी वाढेल हा यामागील उद्देश होता. मात्र या बंधाऱ्याचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. नदीच्या पात्रात दीड फुटाची सिमेंट भिंत उभारण्यात आली आहे. या भिंतीमुळे नदी पात्रात धोका निर्माण झाला आहे. ज्या भागात संरक्षण भिंत आहे. त्या भागातील नदी पात्र जास्त प्रमाणात खचले असल्याचे दिसून येते. या बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग होत नाही. मात्र नदीपात्राची हानी होत आहे. त्यामुळे ही भिंत पाडण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)