रिंकू शर्मा हत्याकांडातील आराेपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:09 IST2021-02-18T05:09:08+5:302021-02-18T05:09:08+5:30
सिरोंचा : श्रीराममंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलनाचे कार्य करणाऱ्या दिल्ली येथील मंगोलपुरी भागात राहणाऱ्या रामभक्त रिंकू शर्मा यांची ...

रिंकू शर्मा हत्याकांडातील आराेपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
सिरोंचा : श्रीराममंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलनाचे कार्य करणाऱ्या दिल्ली येथील मंगोलपुरी भागात राहणाऱ्या रामभक्त रिंकू शर्मा यांची हत्या करणाऱ्या आराेपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत सिरोंचातील रामभक्तांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतीच्या नावे निवेदन सादर केले.
१५ फेब्रवारीला सकाळी ११.३० ते १२.३० दरम्यान सिरोंचातील श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण कार्यालयात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी एकत्रित होऊन हातात भगवा ध्वज घेऊन हत्या करणाऱ्या फाशी देण्याची मागणी केली. मुख्य मार्गे राजीव चाैकापासून तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार एच. एस. सय्यद यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्वामी बोगोंनी, रामन्ना तोटावार, दामोदर अरिगेला, नरसिंग सिलवेरी, संतोष चंदावार, शिवाजी तोटावार, वसंत तोकला, नागेश ताडबोइना, सुरज दुदी, श्रीधर आनकरी, माधव कासरलावार, दिनेश शुकंरी, शेखर मबबु, लक्ष्मीनारायण संगेम, शंकर घरपट्टी, सुरेश लगावार, तिरुपती नुसेटी आदी उपस्थिती होते.