वैनगंगा नदी पुलावर डांबरीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:38 IST2021-04-02T04:38:11+5:302021-04-02T04:38:11+5:30
भेंडाळा : वैनगंगा नदीच्या हरणघाट पुलावरील डांबर उखडल्याने पुलावरून ये-जा करताना वाहन चालकांना त्रास हाेत आहे. दोन महिन्यांपूर्वी या ...

वैनगंगा नदी पुलावर डांबरीकरणाची मागणी
भेंडाळा : वैनगंगा नदीच्या हरणघाट पुलावरील डांबर उखडल्याने पुलावरून ये-जा करताना वाहन चालकांना त्रास हाेत आहे. दोन महिन्यांपूर्वी या पुलावरचे डांबर पूर्णतः काढण्यात आले, परंतु अजूनपर्यंत या पुलावर नवीन डांबर टाकण्यात आले नाही. या ठिकाणी किरकोळ अपघातही झाले आहेत. त्यामुळे पुलावर डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हरणघाट नदी पुलावर कठडे आहेत. त्यामुळे अतिवेगाने येणारी वाहने एखाद्या वेळी पुलाचे कठडे तोडून वाहनासह नदीपात्रात काेसळू शकतात. हा धाेका असतानाही पुलाची देखभाल दुरुस्ती करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे. दरवर्षीच पावसाळ्यात पुलावरील डांबर उखडते. विशेष म्हणजे, चामोर्शी-मूल हा रस्ता पूर्ण उखडला असल्याने, या परिसरातील नागरिक चांगलेच संतापले आहेत. आजच्या घडीला वैनगंगा पुलावर एक दोन नव्हे, तर अनेक ठिकाणचे डांबर काढल्याने रस्त्यावरचा उंच भाग स्पष्ट दिसून येताे. याच ठिकाणी विशेषत: रात्री अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.