माता व बालमृत्यूप्रकरणी कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST2021-03-27T04:38:20+5:302021-03-27T04:38:20+5:30
तालुक्यातील नवेझरी, आंबेखारी येथे पूर्णवेळ डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु हे डॉक्टर कधीच नवेझरी व आंबेखारी येथे गेले ...

माता व बालमृत्यूप्रकरणी कारवाईची मागणी
तालुक्यातील नवेझरी, आंबेखारी येथे पूर्णवेळ डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु हे डॉक्टर कधीच नवेझरी व आंबेखारी येथे गेले नाही. गरोदर महिलांना याेग्य आहार मिळत नाही. तसेच त्यांची वेळेवर व नियमित तपासणी हाेत नाही. नवेझरी येथे डॉ. विद्या बोरकर यांची नियुक्ती केली आहे. त्या २०१५ पासून कार्यरत आहेत. परंतु डाॅक्टर या गावात कधीच गेल्या नाही. तालुक्यातील माता व बालमृत्यूला डाॅक्टर व तालुका वैद्यकीय अधिकार जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नवेझरी येथील ग्रामसभा पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद पाेलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदन देताना ग्रामसभेचे अध्यक्ष हरिचंद्र हिळामी, सचिव रितेश कोल्हे, बिसन नरेटी, मंदारमाला काटेंगे, सुंदर बोगा, मंगला हिळामी, कांडे हिळामी, संदीप मडावी, गंगाराम कल्लो, तानसिंग कुमोटी, गणेश बोगा, रामसिंह हिळामी, राजेश हलामी, शेषराम कोरचा, अमरसिंह वट्टी, अमित केरामी आदी उपस्थित होते.