शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

ट्रॅक्टर ट्रॉलीत महिलेची प्रसुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:24 AM

गावापर्यंत रूग्णवाहिका जाऊ शकत नसल्याने आरोग्य कर्मचारी गर्भवती महिलेला रूग्णालयात भरती करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले. प्रसुतीसाठी तिला रूग्णालयात आणले जात असताना ती ट्रॅक्टर ट्रॉलीमध्येच प्रसुती झाली. मात्र सोबत आरोग्य कर्मचारी असल्याने माता व नवजात बालक दोघेही सुखरूप आहेत.

ठळक मुद्देगावापर्यंत रस्ताच नाही : हितापडी येथील महिला, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : गावापर्यंत रूग्णवाहिका जाऊ शकत नसल्याने आरोग्य कर्मचारी गर्भवती महिलेला रूग्णालयात भरती करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले. प्रसुतीसाठी तिला रूग्णालयात आणले जात असताना ती ट्रॅक्टर ट्रॉलीमध्येच प्रसुती झाली. मात्र सोबत आरोग्य कर्मचारी असल्याने माता व नवजात बालक दोघेही सुखरूप आहेत.भामरागड तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर हितापडी हे गाव आहे. सदर गाव आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. हितापडी येथील शांती राकेश पुंगाटी या गरोदर महिलेला रविवारी सकाळी १० वाजता प्रसुती कळा सुरू झाल्या. याबाबतची माहिती आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली. महिलेला रूग्णालयात आणण्यासाठी रूग्णवाहिका पाठवण्यात आली. मात्र हिदूर नंतर हितापडी गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. केवळ पायवाट आहे. सततच्या पावसामुळे या पायवाटेवर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे रूग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही. मात्र प्रसवकळा सुरू झाल्याने शांतीला तत्काळ रूग्णालयात भरती करणे आवश्यक होते. त्याचबरोबर चालत किंवा दुचाकीवरही आणणे अशक्य होते. आरोग्य कर्मचाºयांनी समयसूचकता दाखवत ट्रॅक्टर बोलविली. ट्रॅक्टर गावापर्यंत नेण्यात आली.ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसवून शांतीला आरेवाडा येथे आणले जात होते. मात्र मार्गातच तिची प्रसुती झाली. शांतीने गोंडस बाळाला जन्म दिला. सोबत डॉक्टर व आरोग्य कर्मचारी असल्याने प्रसुतीची प्रक्रिया सुरळीत पार पडली. माता व बालक दोघेही सुखरूप आहेत. दोघांनाही आरेवाडा येथील रूग्णालयात आणण्यात आले.हे सर्व कार्य तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात आरेवाडा आरोग्य केंद्राचे डॉ. सूचिता दाडगे, परिचारिका भारती, सपना, कुमरे, वाहन चालक पिंटूराज मंडलवार, एमपीडब्ल्यू चिलबुले यांनी पार पाडले. माता व बालकाला सध्या हेमलकसा येथील रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचाºयांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर