न्यायालयाच्या आदेशाने लक्ष्मी मने यांना निवडणूक चिन्ह वितरित

By Admin | Updated: February 11, 2017 01:50 IST2017-02-11T01:50:32+5:302017-02-11T01:50:32+5:30

जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लक्ष्मी मने यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Delivered the election symbol to Laxmi Mane by the court order | न्यायालयाच्या आदेशाने लक्ष्मी मने यांना निवडणूक चिन्ह वितरित

न्यायालयाच्या आदेशाने लक्ष्मी मने यांना निवडणूक चिन्ह वितरित

आरमोरी : जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लक्ष्मी मने यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने लक्ष्मी मने यांना निवडणूक चिन्ह वितरित करावे, असे आदेश दिल्यानंतर निवडणूक विभागाने त्यांना निवडणूक चिन्ह शुक्रवारी वितरित केले.
उमेदवारी अर्जासोबत लक्ष्मी मने यांनी जो शौचालयाचा प्रमाणपत्र सादर केला आहे, त्या प्रमाणपत्रावर शौचालय वापरत असल्याबाबतचा उल्लेख नसल्याच्या कारणावरून जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला होता. या निर्णयाविरोधात लक्ष्मी मने यांनी उच्च न्यायालयात शुक्रवारी रिट याचिका दाखल केली. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी करताना उच्च न्यायालयाने लक्ष्मी हरीष मने यांना निवडणूक चिन्ह वितरित करण्याचे निर्देश निवडणूक विभागाला दिले. लक्ष्मी मने यांची याचिका १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सुनावणीसाठी ठेवण्यात येईल. रिठ याचिकेतील अंतिम निर्णयाच्या अधिन राहून लक्ष्मी मने यांना निवडणूक चिन्ह वितरित करण्यात येत असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाचे सहायक सरकारी वकील निरज पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दुपारी १.४५ वाजता भ्रमणध्वनीद्वारे याबाबतची माहिती दिली व निवडणूक चिन्हाचे वितरण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कार्यवाही करीत लक्ष्मी मने यांना निवडणूक चिन्ह वितरित केला आहे. १४ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे मतदार व नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: Delivered the election symbol to Laxmi Mane by the court order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.