दुसऱ्या डोसला उशीर झाला? काळजीचे कारण नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:39 IST2021-05-06T04:39:23+5:302021-05-06T04:39:23+5:30

जिल्ह्यात सर्वप्रथम फ्रंटलाईन वर्करला, त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, ४५ वर्षांवरील नागरिकांना आणि आता १८ वर्षांवरील सर्वांना लसीचा पहिला ...

Delayed second dose? No worries! | दुसऱ्या डोसला उशीर झाला? काळजीचे कारण नाही!

दुसऱ्या डोसला उशीर झाला? काळजीचे कारण नाही!

जिल्ह्यात सर्वप्रथम फ्रंटलाईन वर्करला, त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, ४५ वर्षांवरील नागरिकांना आणि आता १८ वर्षांवरील सर्वांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जात आहे. एकूण ७२ केंद्रांवरून सुरू असलेल्या लसीकरणासाठी आता नागरिक झुंबड करीत असल्याने केंद्रांवर पोहोचलेला लसींचा साठा दोन दिवसांतच संपून जात आहे. परिणामी, लसीकरण थांबविण्याची वेळ येत आहे.

ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरही आणि आपला नंबर लागलेला असतानाही लस मिळत नसल्याने काही लोक तीव्र नाराजीही व्यक्त करताना दिसतात. विशेषत: ज्यांनी पहिला डोस घेतला आहे आणि आता दुसरा डोस घेण्याची वेळ आली आहे असे लोक अधिक काळजी करताना दिसतात. दुसरा डोस वेळेत घेतला नाही, तर पहिला डोस निष्प्रभ ठरणार का? आपल्याला कोरोनाची लागण होणार का, असे प्रश्न त्यांच्या मनात उठत आहेत. मात्र दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तरी कोणताही दुष्परिणाम होणार नाही, असा दिलासा लसीकरण अधिकाऱ्यांंनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.

दुसऱ्या डोससाठी किती असावे अंतर?

जिल्ह्याच्या लसीकरणाची जबाबदारी सांभाळणारे डॉ. समीर बनसोडे यांनी सांगितले, पूर्वी २८ दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस घेण्याची सूचना होती. पण, आता कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांच्या अंतराने घेता येतो. तसेच कोव्हॅक्सिन या लसीचा दुसरा डोस ४ ते ६ आठवड्यांच्या अंतराने घेण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. यात थोडा फरक पडला तरी घाबरू नये, त्याचे दुष्परिणाम नसल्याचे डॉ. बनसोडे यांनी सांगितले.

२४ हजार लस उपलब्ध

- १८ वर्षांवरील युवकांचे लसीकरण सुरू झाल्याने लसीकरणासाठी गर्दी वाढली आहे. त्यामुळे उपलब्ध लसी लवकरच संपत आहे.

- काही ठिकाणच्या केंद्रांवर लसीचा साठा नसल्यामुळे ते केंद्र लसीकरणासाठी बंद ठेवण्याची वेळ आली होती. मात्र बुधवारी २४ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत.

- १८ ते ४४ वयोगटासाठी अजून ५ ते ६ लसीकरण केंद्रे लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील गर्दीही कमी होईल.

Web Title: Delayed second dose? No worries!