शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सेवाज्येष्ठता यादी सादर करण्यास विलंब

By admin | Updated: September 3, 2016 01:34 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बीएड प्रशिक्षीत शिक्षकांच्या एका रिठ याचिकेच्या संदर्भात ...

उच्च न्यायालयाचे होते निर्देशगडचिरोली : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बीएड प्रशिक्षीत शिक्षकांच्या एका रिठ याचिकेच्या संदर्भात गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आॅगस्ट १९९९ पासून पदवीधर व बीएड अहर्ताधारक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या बाबीला साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटूनही न्यायालयाला शिक्षकांची यादी सादर करण्यात आली नाही. गडचिरोली जिल्हा परिषदेने सन २००० व २००१ मध्ये बीएड प्रशिक्षीत प्राथमिक शिक्षक उपलब्ध असताना अप्रशिक्षीत पदवीधर शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी निवड केली. यामुळे या पदासाठी पात्र असणाऱ्या प्रशिक्षीत शिक्षकांवर अन्याय झाला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिठ याचिका दाखल केली. या संदर्भातील निर्णय २० एप्रिल २०१६ ला पारीत झाला. सदर न्यायालयीन निर्णयात विठ्ठल कत्रूजी मडावी विरूध्द जिल्हा परिषद चंद्रपूर या रिठ याचिकेच्या निकालाचा संदर्भ देऊन वरील वेतनश्रेणी ठरविण्यासाठी बीएड हे शैक्षणिक अहर्ता धारण करण्याची तिथी ही मुख्य बाब आहे, असे नमूद केले. शिवाय गडचिरोली जिल्हा परिषदेने १९९९ पासून पदवीधर प्राथमिक शिक्षक पदासाठी पदवी व बीएडधारक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार न केल्याने या पदासाठी पात्र असणाऱ्या पदवीधर शिक्षकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याकडे सुध्दा न्यायालयाने आपल्या निर्णयात लक्ष वेधले आहे. साडेतीन महिन्यांमध्ये पदवीधर प्रशिक्षीत शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करून न्यायालयात सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा परिषदेला दिले होते.न्यायालयाने निर्धारीत केलेला कालावधी समाप्त होऊनही शिक्षण विभागाने बीएडधारक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी न्यायालयात सादर केली नाही. हा न्यायालयाचा अपमान असून या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी याचिकाकर्त्यांनी सुरू केली आहे. (नगर प्रतिनिधी)अवमान याचिका दाखल करणारबीएडधारक शिक्षकांची १९९९ पासूनची यादी तयार करून ही यादी न्यायालयास साडेतीन महिन्यात सादर करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा परिषदेला दिले होते. मात्र साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटूनही शिक्षण विभागाचे यादी तयार करण्याचे काम पूर्ण झाले नाही व न्यायालयाला यादी सादर केली नाही. यामुळे न्यायालयाचा अपमान झाला असून या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी याचिकाकर्त्यांनी सुरू केली आहे.