कर्जमुक्त शेतकऱ्यांची नावे जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:30 IST2017-07-22T00:30:10+5:302017-07-22T00:30:10+5:30
कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची नावे जाहीर करून त्यांना तत्काळ नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे,

कर्जमुक्त शेतकऱ्यांची नावे जाहीर करा
निवेदन : काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची नावे जाहीर करून त्यांना तत्काळ नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
राज्य शासनाने थकीत कर्जमाफीची घोषणा केली असून शेतकऱ्यांना तत्काळ दहा हजार रूपये शासकीय हमीवर कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना १४ जून २०१७ रोजी केलेल्या आहेत. परंतु अद्यापही जिल्ह्यातील बँकांनी थकीत कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केलेली नाही. तसेच नव्याने कर्जसुद्धा उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रूपये प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा सरकारने केली. मात्र याचासुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना माजी आ. आनंदराव गेडाम, माजी पं. स. सभापती बग्गू ताडाम, तालुका काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष सुभाष सपाटे, युकाँचे आरमोरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, चंदू वडपल्लीवार, दत्तू सोमनकर, मंगरू वरखडे, नीलकंठ गोहणे, आनंदराव राऊत, शाबिर शेख, अंकुश गाढवे, सतीश सहारे, आकाश कांबळे, राहुल हनवते, आकाश भोयर, नितीन लिंगायत, पंढरी दोनाडकर, पुरूषोत्तम मेश्राम, चुधरी आदी उपस्थित होते.