९ ऑगस्टला शासकीय सुटी जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:25 IST2021-07-21T04:25:10+5:302021-07-21T04:25:10+5:30
गुड्डीगुडम : ९ ऑगस्ट राेजी जागतिक आदिवासीदिनी शासकीय सुटी जाहीर करून हा दिवस साजरा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ...

९ ऑगस्टला शासकीय सुटी जाहीर करा
गुड्डीगुडम : ९ ऑगस्ट राेजी जागतिक आदिवासीदिनी शासकीय सुटी जाहीर करून हा दिवस साजरा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आदिवासी समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जगातील १९२ पेक्षा जास्त सदस्य संख्या असलेली संयुक्त राष्ट्रसंघ (यूनाे) ने सन १९९४ च्या ११ व्या अधिवेशनात आदिवासी समाजातील लोकांना न्याय देण्यासाठी तसेच आदिवासी संस्कृती, बोलीभाषा, रूढी, प्रथा, परंपरा यांचे जतन करण्यासाठी तसेच आदिवासी समाजाला त्यांचा पारंपरिक व सवैधानिक अधिकार मिळण्याकरिता ९ ऑगस्ट १९९४ ला जागतिक आदिवासी दिवस घोषित केला. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजबांधवांना काेविडचे नियम पाळून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी ९ ऑगस्ट राेजी शासकीय सुटी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात तहसीलदार ओंकार ओतारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, कमलापूरचे माजी सरपंच संबय्या करपेत, ग्रा.पं.सदस्य राजेंद्र इष्टम, जी. के. मडावी, बंडू आत्राम, लाच्या आत्राम, शंकर आत्राम आदी उपस्थित हाेते.
200721\img-20210719-wa0020.jpg
आदिवासी समाज संघटनेचे वतीने निवेदन सादर...