जनतेचा विश्वास सार्थ ठरवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:24 IST2019-06-10T21:24:27+5:302019-06-10T21:24:42+5:30
जनतेने माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास टाकला. या विश्वासाला आपण कदापी तडा जाऊ देणार नाही. चामोर्शी तालुक्याचा लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो, असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले. रविवारी चामोर्शी येथे खा.अशोक नेते यांच्या विजयाची रॅली काढून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

जनतेचा विश्वास सार्थ ठरवू
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : जनतेने माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास टाकला. या विश्वासाला आपण कदापी तडा जाऊ देणार नाही. चामोर्शी तालुक्याचा लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो, असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले.
रविवारी चामोर्शी येथे खा.अशोक नेते यांच्या विजयाची रॅली काढून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आ.डॉ.देवराव होळी, जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, रवींद्र ओल्लालवार, डॉ.भारत खटी, रमेश भुरसे, नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, स्वप्नील वरघंटे, पं.स.सभापती आनंद भांडेकर, प्रकाश गेडाम, आनंद गण्यारपवार, पप्पी पठाण, विलास ठोंबरे, अमित यासलवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी चामोर्शी शहरातून नवनिर्वाचित खा.अशोक नेते यांची विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीत आ.डॉ.देवराव होळी यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जि.प.सदस्य विद्या आभारे, रमेश बारसागडे, नगरसेविका रोशनी वरघंटे तसेच चंद्रगुप्त कोटांगले, रतन सरकार, शंभूविधी गेडाम, मनमोहन बंडावार, श्रावण सोनटक्के, रेवनाथ कुसराम, माधुरी पेशट्टीवार, मिनल पालारपवार, प्रभाकर मोहुर्ले, जावेद सय्यद आदींनी सहकार्य केले.