कर्जाचे सनियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालयातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 05:00 AM2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:01:16+5:30

जिल्हाधिकारी सदर पोर्टलवर अर्ज करा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले. सदर पोर्टलवर साध्या व सोप्या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना कृषी मित्र, आपले सरकार सेवा केंद्र, बँक सखी, कृषी सहाय्यक यापैकी एकाकडून अर्ज भरायचा आहे. या प्रक्रियेमुळे बँकांना अकारण पीक कर्ज आता नाकारता येणार नाही. पीक कर्जाच्या प्रत्येक अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लक्ष असणार आहे, असे जिल्हाधिकारी सिंगला यांनी सांगितले.

Debt control from the Collectorate | कर्जाचे सनियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालयातून

कर्जाचे सनियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालयातून

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : पोर्टलवर अर्ज करावे; पीक कर्जापासून कोणीही वंचित न ठेवण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : व्यावसायिक बँकांकडून विनाकारण शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारणे, शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची मागणी करून परतवून लावणे आदी प्रकार जिल्ह्यात दिसून येत होते. यावर उपाय म्हणून आता जिल्हाधिकारी कार्यालयाने नवीन पोर्टल तयार केले आहे. यामधून शेतकऱ्यांच्या प्रत्येक पीक कर्ज मागणी अर्जावर संनियंत्रण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी पोर्टलच्या शुभारंभाप्रसंगी सांगितले.
www.kccgad.com या नावाने सुरू केलेल्या पीक कर्ज मागणी पोर्टलचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सदर पोर्टलवर अर्ज करा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले. सदर पोर्टलवर साध्या व सोप्या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना कृषी मित्र, आपले सरकार सेवा केंद्र, बँक सखी, कृषी सहाय्यक यापैकी एकाकडून अर्ज भरायचा आहे. या प्रक्रियेमुळे बँकांना अकारण पीक कर्ज आता नाकारता येणार नाही. पीक कर्जाच्या प्रत्येक अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लक्ष असणार आहे, असे जिल्हाधिकारी सिंगला यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यातील व्यावसायिक बँका नेहमी कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. तसेच त्यांना दिलेल्या पीक कर्जाचे उद्दिष्ठही पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. यावर गरजू शेतकºयांना वेळेत व तातडीने पीक कर्ज मंजूर व्हावे, यासाठी सदर पोर्टल उपयोगी पडणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. राज्यात हा नावीण्यपूर्ण प्रकल्प असून यातून शेती व्यवसायाला चालना मिळेल. शेतकºयांना वेळेत बी-बियाणे, खते व मजुरीसाठी पैसे हातात मिळतील. लागवडीचे क्षेत्र वाढण्यासही मदत होईल, असे सिंगला यांनी सांगितले. उद्घाटनप्रसंगी जिल्हा उपनिबंधक, अग्रणी बँक व्यवस्थापक व सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने बहुतांश शेतकरी खरीप हंगामात पीककर्जावरच अवलंबून असतात.

आजपासून करता येणार अर्ज
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या www.kccgad.com या पोर्टलद्वारे २९ जून सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरूवात करावी. यामध्ये काही अडचण निर्माण झाल्यास कृषी मित्र, आपले सरकार सेवा केंद्र, बँक सखी, कृषी सहाय्यक यापैकी एकाकडून मदत घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे. ही प्रक्रिया शेतकºयांसाठी फार अवघड असली तरी इतरांची मदत घेऊन ती पूर्ण करावी. कारण आता कोणाचेही कर्ज विनाकारण नाकारले जाणार नाही. तसेच प्रशासनाकडे सर्व गरजू शेतकऱ्यांची माहिती ही एकत्रितरित्या संकलित होणार नाही. या माहितीचा उपयोग पुढील वर्षीही पीक कर्ज वाटप करताना होणार असल्याचे जिल्हाधिकारी सिंगला यांनी सांगितले.

यंदा ३९० कोटीच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट
गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी अंदाजे १५९ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे सर्व बँकांना उद्दिष्ट असते. मात्र यावर्षी पीक कर्जाच्या उद्दिष्टात वाढ करण्यात आली आहे. यंदा गडचिरोली जिल्ह्यात सर्व बँका मिळून एकूण ३९० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. १५ जुलैपर्यंत ५० टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सर्व बँकांना देण्यात आले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३६ टक्के पीक कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. यामध्ये व्यावसायिक बँकांनी १५ टक्के तर सहकारी बँकांनी ६६ टक्के उद्दिष्ट गाठले आहे.

Web Title: Debt control from the Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.