कोरचीत स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू
By Admin | Updated: November 14, 2015 01:36 IST2015-11-14T01:36:18+5:302015-11-14T01:36:18+5:30
येथील महेश राऊत (३०) या युवकाचा शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास स्वाईन फ्लूने मृत्यू झाला.

कोरचीत स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू
कोरची : येथील महेश राऊत (३०) या युवकाचा शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. महेश राऊतला मागील २० दिवसांपासून ताप येत होता. तो ग्रामीण रुग्णालय कोरची येथे औषधोपचार घेत होता. १५ दिवसांपूर्वी त्याला नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्याला स्वाईन फ्लूची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले. त्याच रुग्णालयात औषधोपचार सुरू होता. दरम्यान पहाटे ३ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
कोरची येथे स्वाईन फ्लू रोग आणखी पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने या ठिकाणी विशेष शिबिर घेऊन नागरिकांची तपासणी करावी, अशी मागणी कोरचीवासीयांकडून होत आहे. मात्र आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.