आरमोरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा

By Admin | Updated: November 1, 2015 02:00 IST2015-11-01T02:00:39+5:302015-11-01T02:00:39+5:30

स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळा घेण्यात आला.

The death anniversary of Rashtrasant Tukdoji Maharaj | आरमोरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा

आरमोरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा

सांस्कृतिक विभागातर्फे कार्यक्रम : महात्मा गांधी महाविद्यालयात आदरांजली
आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळा घेण्यात आला. यावेळी राष्ट्रसंतांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर वनमाळी यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूजन शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव हरिश्चंद्र बोंदरे तर स्व. वामनराव वनमाळी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पूजन प्रभारी प्राचार्य डॉ. गोपाल तामगाळे यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संचालन प्रा. पराग मेश्राम यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष अब्दुल पंजवानी, सोनबा निखारे, गोपाळ कुंभारे उपस्थित होते. प्रा. नोमेश मेश्राम, प्रशांत दडमल, किशोर कुथे, हेमके, ठाकरे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The death anniversary of Rashtrasant Tukdoji Maharaj