बालविकास कार्यालयाची दैना

By Admin | Updated: April 24, 2015 00:05 IST2015-04-24T00:05:01+5:302015-04-24T00:05:01+5:30

अंगणवाडी केंद्रांना विविध साहित्यांचा पुरवठा करणारे एकात्मिक बालविकास कार्यालय सुस्थितीत असणे गरजेचे असते.

The day-to-day child development office | बालविकास कार्यालयाची दैना

बालविकास कार्यालयाची दैना

अहेरी : अंगणवाडी केंद्रांना विविध साहित्यांचा पुरवठा करणारे एकात्मिक बालविकास कार्यालय सुस्थितीत असणे गरजेचे असते. परंतु अहेरी येथील एकात्मिक बालविकास कार्यालयाचे छत मोडकळीस येऊन इमारतीची दैना झाली आहे. परंतु येथूनच केंद्रांना साहित्य पुरवठा केला जात असल्याने प्रशासनाचा बालकांप्रती असलेली जबाबदारी किती प्रबळ आहे, याची प्रचिती येत आहे. इमारतीच्या दुर्दशेमुळे ती के व्हा कोसळेल याचा नेम नाही.
अहेरी येथील एकात्मिक बालविकास कार्यालयाची इमारत पूर्णत: मोडकळीस आली आहे. परंतु इमारतीच्या दुरूस्तीकडे प्रशासनाची जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे. इमारतीत अंगणवाडी केंद्रांना पुरवठा करण्यात येणाऱ्या साहित्याचीही नासधूस झाली आहे. मात्र साहित्य सुस्थितीत ठेवण्याबाबत प्रशासन उदासीन असल्याचे एकूणच परिस्थितीवरून दिसून येत आहे. एकात्मिक बालविकास कार्यालयात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे दालन मात्र सुस्थितीत आहे. इतर ठिकाणी छत उडून भगदाळ पडले आहे. परिणामी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात ठेवले जाणारे साहित्य उघड्यावरच आहे. त्यामुळे या साहित्यांची मोठ्या प्रमाणावर नासधूस होत आहे. प्रकल्प कार्यालयाच्या इमारतीची पडझड झाल्याने येथे साहित्य ठेवण्याची मोठी अडचण होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी इमारतीच्या दुरूस्तीबाबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मागील वर्षीही बीआरजीएफमधूनही इमारत दुरूस्तीची मंजुरी मिळाली होती. परंतु एक वर्षांचा कालावधी उलटूनही इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही, असे बालविकास अधिकारी मेश्राम यांनी सांगितले. पावसाळ्यात इमारतीत साहित्य ठेवताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचाही फटका येथील साहित्याला बसला. त्यामुळे यापुढेही येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे वस्तूंची नासधूस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकात्मिक बालविकास प्रकल्प इमारतीचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: The day-to-day child development office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.