दराचीवासीयांनी श्रमदानातून उभारली विद्यार्थ्यांसाठी गवत व बांबूची कुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:00 AM2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:19+5:30

गावात असलेली शाळेची इमारत जीर्ण झाल्याने यावर्षीच्या शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीपासून दराची येथील शाळा गावापासून जवळपास ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका इमारतीत भरविली जात आहे. या ठिकाणी एकच वर्गखोली आहे. एका वर्गखोलीत चार वर्गांच्या विद्यार्थ्यांना शिकविणे कठीण होत होते. तसेच शालेय पोषण आहाराचे साहित्य, शैक्षणिक साहित्य, टेबल खुर्च्या, सोबतच दोन शिक्षकांसाठी दोन टेबल व दोन खुर्च्या एवढे साहित्य ठेवून अध्यापन करणे कठीण होत होते.

Darachi residents built hay and bamboo hut for the students | दराचीवासीयांनी श्रमदानातून उभारली विद्यार्थ्यांसाठी गवत व बांबूची कुटी

दराचीवासीयांनी श्रमदानातून उभारली विद्यार्थ्यांसाठी गवत व बांबूची कुटी

Next
ठळक मुद्देचार वर्ग भरत होते एकाच खोलीत : वर्गखोली बांधण्यास विलंब होत असल्याने पालकांनी शोधला स्वत:च उपाय

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : चार वर्गांसाठी एकच वर्गखोली असल्याने विद्यार्थी व शिक्षकांची फार मोठी घुसमट होत होती. सरकारी काम व लांबचलांब या मनी प्रमाणे जि.प.ने वर्गखोली मंजूर केली. मात्र बांधकाम कधी होणार हे निश्चित नाही. तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळे येत असल्याने दराचीवासीयांनी श्रमदानातून बांबू व गवताची आकर्षक कुटी बनविली. या कुटीचा उपयोग वर्गखोली म्हणून केला जात आहे.
गावात असलेली शाळेची इमारत जीर्ण झाल्याने यावर्षीच्या शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीपासून दराची येथील शाळा गावापासून जवळपास ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका इमारतीत भरविली जात आहे. या ठिकाणी एकच वर्गखोली आहे. एका वर्गखोलीत चार वर्गांच्या विद्यार्थ्यांना शिकविणे कठीण होत होते. तसेच शालेय पोषण आहाराचे साहित्य, शैक्षणिक साहित्य, टेबल खुर्च्या, सोबतच दोन शिक्षकांसाठी दोन टेबल व दोन खुर्च्या एवढे साहित्य ठेवून अध्यापन करणे कठीण होत होते. ही बाब मुख्याध्यापकांनी दराचीवासीयांच्या लक्षात आणून दिल्यानंतर दराचीवासीयांनी ४० फूट व्यासाची बांबू व गवताची कुटी उभारून दिली. या वर्गखोलीत वर्ग भरण्यास सुरूवात झाली आहे. कुटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुरूकुलातील शिक्षण पध्दतीचा अनुभव येत आहे. कुटी उभारण्यासाठी मुख्याध्यापक वसंतराव गुरनुले, सहायक शिक्षक राजेश्वर कुनघाडकर यांच्यासह गावपाटील लच्चुराम उईके, शाळा समिती अध्यक्ष रामू उईके, संतोष ऐक्का, ग्रामसभा सचिव अवसू नरोटे, ग्रामसभा अध्यक्ष प्रमोद तुलावी, रमाबाई मडावी यांनी विशेष पुढाकार घेतला.

स्वत:च शोधला उपाय
जिल्ह्यातील अनेक शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या जीर्ण इमारतींमध्येच वर्ग घेतले जात आहेत. मात्र दराचीवासीयांनी शासनाच्या भरवशावर अवलंबून न राहता स्वत:च्या मुलांसाठी स्वत:च कुटी उभारून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. इतर शाळांसाठी ही शाळा व गाव प्रेरणायी ठरणारे आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली शाळेला भेट
श्रमदानातून कुटी उभारून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. ही बाब शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे यांना माहित झाल्यानंतर त्यांनी स्वत: १० जानेवारी रोजी शाळेला भेट दिली. यावेळी उपशिक्षणाधिकारी एम. एन. चलाख, केंद्र प्रमुख वसंत भुरे, विस्तार अधिकारी सुधीर आखाडे, छत्रपती मडावी आदी उपस्थित होते. या सर्वांनी गावकरी व शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांची चाचणी घेतली असता, विद्यार्थी अभ्यासातही हुशार असल्याचे दिसून आले.

एकाच वर्गखोलीत चार वर्ग बसविणे कठीण होत होते. ही बाब ग्रामस्थांना लक्षात आणून दिली असता, गावकऱ्यांनी शाळेच्या परिसरातच कुटी उभारून दिली. या कुटीत आता अध्यापन सुरू आहे. शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी सुध्दा स्वतंत्र कुटी बनविली आहे. गावातील नागरिकांनी सहकार्य केल्याने हे शक्य झाले आहे.
-वसंतराव गुरनुले, मुख्याध्यापक

Web Title: Darachi residents built hay and bamboo hut for the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा