शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

‘ई-पॉस’वरील अंगठा वाढविणार जिल्ह्यात कोरोनाचा धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 5:00 AM

संचारबंदीमुळे अनेक नागरिकांच्या हातचे काम हिरावले गेले आहे. राेजगार बुडाल्याने त्यांना माेफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हाभराची धान्याची मागणी नाेंदवली गेली. त्यानुसार वाढीव धान्याला मंजुरीही मिळाली असून ते धान्य संबंधित रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दोन दिवसांत मोफत धान्य वाटपाला सुरुवात होऊ शकते. 

ठळक मुद्देमोफत स्वस्त धान्य वाटप, २ लाख रेशनकार्डधारक लाभार्थी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाच्या संकटात कमी उत्पन्न गटातील रेशनकार्डधारकांना एक महिन्याचे माेफत धान्य दिले जाणार आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ई-पॉस मशीनवर लावणारा जाणारा अंगठा न घेता धान्य वाटप करण्याबाबत सरकारने अजून कोणतीही सूचना दिलेली नाही. अशा स्थितीत ई-पॉसवरील बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप कोरोना पसरण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.संचारबंदीमुळे अनेक नागरिकांच्या हातचे काम हिरावले गेले आहे. राेजगार बुडाल्याने त्यांना माेफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हाभराची धान्याची मागणी नाेंदवली गेली. त्यानुसार वाढीव धान्याला मंजुरीही मिळाली असून ते धान्य संबंधित रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दोन दिवसांत मोफत धान्य वाटपाला सुरुवात होऊ शकते. राज्य सरकारप्रमाणेच केंद्र सरकारनेही माेफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षीही अशाच पद्धतीने लॉकडाऊनच्या काळात मोफत धान्य वापट करण्यात आले होते. त्यावेळी कोरोनाचा धोका टाळण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने न करता साध्या पद्धतीने नोंदी ठेवून धान्य वाटप झाले. 

सॅनिटायझर, मास्क बंधनकारकच रेशन दुकानावर धान्य घेण्यासाठी जाताना ग्राहकांना गर्दी न करता शारीरिक अंतर कायम ठेवावे लागणार आहे.  मास्क किंवा रूमालाने नाक-ताेंड झाकूनच ठेवावे लागणार आहे. अन्यथा इतरांचा जीव धाेक्यता येईल.  पाॅस मशीनवर प्रत्येक ग्राहकाऐवजी दुकानदराचेच थम्ब ग्राह्य धरले जाण्याची शक्यता आहे. अशावेळी सॅनिटायझरचा वापर करावा लागेल.

दुकानदार म्हणतात आम्हाला विमा संरक्षण द्या

कोरोना सध्या अत्युच्च पातळीवर असताना रेशनचे धान्य पॉस मशीनच्या माध्यमातून वाटप करण्याची जोखीम पत्करणे रेशन दुकानदारांना चुकीचे वाटते. यात लाभार्थ्यांसह आमचाही जीव धोक्यात येऊ शकतो, असे या दुकानदारांचे म्हणणे आहे. 

पाॅस मशीनने धान्य वाटप करण्याऐवजी गेल्या तीन महिन्यात ज्यांनी धान्य उचलले त्यांना ऑफलाईन पध्दतीने कार्डवर नाेंदणी करून धान्य वाटप करण्याची मुभा द्यावी, अशीही रेशन दुकानदारांची मागणी हाेती. परंतु सरकारकडून ती मान्य करण्यात आलेली नाही.

लाभार्थ्यांचा जीव धोक्यातरेशनचे धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांपैकी कोणी कोरोना पॉझिटिव्ह असल्यास पॉस मशीनच्या माध्यमातून त्याची लागण इतरांना होऊ शकते. याशिवाय धान्यासाठी रांग लागल्यानंतर योग्य खबरदारी आणि शारीरिक अंतराचे नियम न पाळल्यास रांगेतील इतर व्यक्तींमध्ये कोरोना पसरण्याची शक्यता असते.

शासनाच्या निर्देशानुसार पॉस मशीनच्या माध्यमातूनच धान्य वाटप केले जाईल. कोरोनाची परिस्थिती पाहता यात थोडा धोका असल्याने दुकानदारांचा त्याला विरोध आहे, पण जसे निर्देश असतील त्याप्रमाणेच होईल.-नरेंद्र भागडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या