लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : सिंचन विभागाच्या वतीने दरवर्षी लहान नाल्यांवर सिंचन बंधाऱ्यांचे बांधकाम केले जाते. या बंधाऱ्यांचा उपयोग पावसाचे अधिकचे पाणी अडविण्यासाठी होतो. एटापल्ली तालुक्यात सिंचनाची साधने अपुरी असल्याने अनियमित पावसातही हे बंधारे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात सुरूवातीपासूनच अनियमित पाऊस येत आहे. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची आवश्यकता भासत आहे. तालुक्यातील कसनसूर मार्गावरील एकरा नाल्यावर अनेक बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे अधिकाधिक पाणी साठण्यास मदत होत आहे. अनेक शेतकरी या पाण्याचा वापर करताना दिसून येत आहे. सुरूवातीपासूनच यावर्षी अनियमित पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांनी नाल्यातील पाण्यचा वापर धान रोवणीसाठी केला. याशिवाय वर्षभर सिंचनाची सोय या बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परिसरातील नाल्यांवर अशा प्रकारचे सिंचन बंधारे बांधण्याची मागणीही जोर धरत आहे.
बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST
तालुक्यातील कसनसूर मार्गावरील एकरा नाल्यावर अनेक बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे अधिकाधिक पाणी साठण्यास मदत होत आहे. अनेक शेतकरी या पाण्याचा वापर करताना दिसून येत आहे. सुरूवातीपासूनच यावर्षी अनियमित पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांनी नाल्यातील पाण्यचा वापर धान रोवणीसाठी केला. याशिवाय वर्षभर सिंचनाची सोय या बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे.
बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना दिलासा
ठळक मुद्देएकरा नाला : अनियमित पावसातही होत आहे सिंचनाची सोय