शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अस्तित्वासाठी छत्तीसगडमधील दलमची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:20 IST

नक्षलविरोधी अभियानात तीन आठवड्यांपूर्वी तब्बल ४० नक्षलवाद्यांना मारल्याने बिथरलेले नक्षलवादी सैरभैर झाले आहेत. अशात त्यांनी गुरूवार दि.१० रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देपोलीस दल सतर्क : नक्षल्यांची आज गडचिरोली बंदची हाक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलविरोधी अभियानात तीन आठवड्यांपूर्वी तब्बल ४० नक्षलवाद्यांना मारल्याने बिथरलेले नक्षलवादी सैरभैर झाले आहेत. अशात त्यांनी गुरूवार दि.१० रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. यादरम्यान आपले अस्तित्व दाखविण्यासाठी छत्तीसगडमधील काही नक्षल्यांना गडचिरोली जिल्ह्यात पाठविले जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात सध्याच्या घडीला मोजक्याच नक्षल्यांचे अस्तित्व आहे. सिरोंचा दलम जवळजवळ संपुष्टात आला आहे. भामरागडमधूनही नक्षल्यांना हद्दपार व्हावे लागत आहे. त्यातच नक्षल दलममध्ये जाण्यासाठी ग्रामीण भागातील युवक नकार देत आहेत.परिणामी धानोरा, कोरची, एटापल्ली, अहेरी तालुक्यात विखुरलेल्या नक्षल्यांच्या दिमतीला आता छत्तीसगडमधील नक्षली येण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या लगत असलेल्या छत्तीसगडमधील जगदलपूर, बस्तर, राजनांदगाव जिल्ह्यात नक्षल्यांचे प्राबल्य आहे. गडचिरोली पोलिसांच्या कारवाईने नक्षल्यांना मोठा हादरा बसला असला तरी जिल्ह्याच्या जंगलातील आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी नक्षल्यांची धडपड सुरू आहे. नक्षली चकमकीत मारल्या गेलेल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांच्याकडून एखादा घातपात घडवून आणल्या जाण्याची शक्यता पाहता पोलिसांनीही आपली गस्त वाढविली आहे.गुरूवारच्या बंददरम्यान सर्व व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस विभाग सतर्क असून कोणत्याही अटीतटीच्या प्रसंगाशी तोंड देण्यासाठी पोलीस सज्ज आहेत.सीआरपीएफकडून ६७० जवानांची भरतीनक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ५ कंपन्यांमध्ये ६७० जवानांची पदे रिक्त होती. ही पदे भरून काढण्यासाठी काही दिवसांपूर्वीच सीआरपीएफकडून नवीन भरती करण्यात आली. यातील काही जवान प्रशिक्षणानंतर गडचिरोली जिल्ह्यात दाखलही झाले असून उर्वरित रिक्त पदेही भरली जाणार असल्याची माहिती सीआरपीएफचे महानिरीक्षक एन.राजकुमार यांनी दिली. ठिकठिकाणी पोलीस यंत्रणेचे जाळे तयार झाल्याने नक्षल चळवळ बॅकफूटवर गेली आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी